शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
2
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
3
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
4
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
6
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
7
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
8
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
9
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
10
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
11
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
12
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
13
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
14
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
15
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
16
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
17
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
18
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
19
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
20
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार

Video: भटक्या श्वानाची चाकूने भोसकून हत्या; छत्रपती संभाजीनगरमधील संतापजनक घटना

By साहेबराव हिवराळे | Published: April 29, 2023 6:01 PM

श्वानाची हत्या करणाऱ्या माथेफिरूच्या अटकेची मागणी प्राणिमित्रांनी केली आहे

छत्रपती संभाजीनगर : उस्मानपुरा परिसरात रस्त्याच्याकडेला शांतपणे उभा असलेल्या एका श्वानाची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा संतापजनक प्रकार मंगळवारी रात्री १ वाजता घडल्याची माहिती आहे. 

हल्ली भटक्या श्वानास दगड मारणे, हाकलून देणे असे प्रकार वाढले आहेत. अन्नाच्या शोधात श्वान रस्त्यावर भटकताना अनेक भागांत दिसून येतात. फार कमीवेळा असे श्वान स्वत:हून हल्ला केल्याचा प्रकार शहरात घडले आहेत. मात्र, रस्त्याच्या कडेला उभा श्वानावर एका माथेफिरूने धारदार चाकूने हल्ला केला. अत्यंत निर्घृणपणे माथेफिरू श्वानाची हत्या करत असल्याचा व्हिडिओ व्ह्याराल झाला आहे. दुसऱ्या दिवशी श्वान रस्त्याच्या कडेस मृत आढळून आल्याने पेट लव्हर्समधून संताप व्यक्त करण्यात आला. 

अगदी शांत डोक्याने या युवकाने श्वानावर चाकूचे वार करून ठार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या माथेफिरू युवकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी उस्मानपुरा भागातील प्राणीमित्रांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना अकोला येथे घडली होती. त्या व्यक्तीवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

शिक्षा झालीच पाहिजे...शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांवर हल्ल्याच्या घटना वारंवार होत असल्याने चिंतेचे वातावरण असल्याचे मत डॉ. अमित परदेशी यांनी व्यक्त केले आहे. तर अशा माठेफिरुंवर तत्काळ कायदेशीर कारवाई करून त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी लाईफ केअर संस्थेचे धनराज शिंदे, जयेश शिंदे यांनी केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादdogकुत्रा