औरंगाबाद : शहरात दुपारी ३ वाजता अचानक वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला ( Rainfall in Aurangabad ) सुरुवात झाली. यावेळी सेशन कोर्टात उभ्या असलेल्या कारवर झाड कोसळले. सुदैवाने कारमधील चारही वकील थोडक्यात बचावले आहेत. ( A tree fell on a car parked in the Aurangabad Session Court premises, four lawyers safe)
शहराला पुन्हा एकदा जोरदार पावसाने झोडपले आहे. दुपारी ३ वाजेच्या दरम्यान अचानक ढग दाटून येत अंधार झाला . यानंतर वादळीवारा आणि विजेच्या कडकडाटासह तब्बल एक तास मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या जुन्या इमारतीमागे ॲड. विनायक उपाध्ये, ॲड. विनोद मुंदडा, ॲड. सुधीर कुलकर्णी आणि ॲड. कल्पना राठोड हे एका कारमध्ये ( एम एच २० डी जे ५९०३ ) होते. ॲड. विनायक उपाध्ये कार मागे घेत असताना अचानक कारवर समोरच्या बाजूने एक झाड कोसळले. कोर्टातील जमादार धीरज काबलीये आणि इतर लोकांनी लागलीच कारमधील चारही वकिलांना बाहेर काढले. चारही वकील सुखरूप आहेत. झाड कोसळ्याने तीन कारचे आणि काही दुचाकींचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे.