गंगापूर : अग्रिम पिकविमा आणि तालुक्यातील मंडळांचा दुष्काळाच्या यादीत समावेश करण्याच्या प्रमुख मागणीसाठी शेतकरी कृती समितीचे राहुल ढोले, महेश गुजर यांनी आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास कृषी कार्यालयावरील मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, सरकारचा निषेध करून शासनाचे परिपत्रक आंदोलकांनी टॉवरवरून भिरकावले. माहिती मिळताच तहसीलदार सतीश सोनी आंदोलन स्थळी दाखल झाले आहेत. पोलीसांचाही तगडा बंदोबस्त येथे आहे.
काय आहेत मागण्या: २०२२ खरिप पिक विमा यादी नुसार मंजूर यादी व अंतिम आकडेवारी नुसार मंजूर यादी, पैसे जमा केलेली यादी, पैसे रद्द झालेली यादी, पिक विमा नामंजूर शेतकरी यादी देण्यात यावी,तालुक्यातील यादीत समावेश नसलेल्या मंडळांचा दुष्काळाच्या यादीत समावेश करणे,२०२२ खरिप पिक विम्या पासून धामोरी बु गावातील वंचीत शेतकर्यच्या खात्यात तात्काळ पिक विमा जमा करणे, सन २०२३ खरीपातील नुकसानीचे २५ टक्के अग्रीम रक्कम त्वरित देणे, यंदा अवकाळी झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावे