शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

विधानसभा निवडणूक १९६२ : गोविंदभाई व रफिक झकेरिया यांच्यात औरंगाबादेत चुरशीची लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2019 1:36 PM

संयुक्त महाराष्ट्र राज्याची १९६२ मध्ये पहिली निवडणूक 

ठळक मुद्देऔरंगाबाद जिल्ह्यातील १० पैकी ९ जागा काँग्रेसला

- शांतीलाल गायकवाड 

औरंगाबाद : भारत स्वतंत्र झाल्यानंतर मराठवाड्याचा राजकीय प्रवास पहिल्या विधानसभा निवडणुकीत हैदराबाद स्टेट, दुसऱ्या विधानसभा निवडणुकीत द्विभाषिक मुंबई राज्य व तिसऱ्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र असा झाला. संयुक्त महाराष्ट्राच्या मराठी भाषिक राज्याच्या पहिल्या निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यातील १० पैकी ९ जागा हस्तगत करून राष्ट्रीय काँग्रेसने वरचष्मा राखला. त्यात औरंगाबाद विधानसभा निवडणूक डॉ. रफिक झकेरिया व मराठवाडा मुक्ती लढ्याचे स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांच्यामुळे चुरशीची झाली. त्यात डॉ. रफिक झकेरिया विजयी झाले होेते. 

मूळचे कोकणातील रहिवासी , उच्च शिक्षित डॉ. झकेरिया रफिक बालूमिया हे पंडित नेहरू यांच्या आग्रहास्तव औरंगाबादेत आले. काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली. त्यांचे प्रतिस्पर्धी गोविंदभाई श्रॉफ हे अपक्ष लढत होते. १९५१ मध्ये झालेली पहिली निवडणूक गोविंदभार्इंनी प्रजावाणीतर्फे याच मतदारसंघातून लढविली होती. तेव्हाही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. डॉ. झकेरिया यांनी १८ हजार ७६७ मते घेत गोविंदभार्इंवर ३ हजार ९५४ मतांनी विजय मिळविला. गोविंदभार्इंना १४ हजार ८१३ मते मिळाली होती. विजयी डॉ. झकेरिया यांना मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी नगरविकास खात्याचे मंत्रीपद दिले. पुढे डॉ. झकेरिया यांनी मागास औरंगाबादचा रचनात्मक विकास घडवून आणला. 

सिल्लोडमधून  काळे विजयीस्वातंत्र्य चळवळीतील धुरंधर बाबूराव काळे यांना काँग्रेसने सिल्लोडमधून उमेदवारी दिली होती. काळे यांनी सीपीआयच्या करुणा चंद्रगुप्त यांचा पराभव केला. काळे यांनी २६ हजार १७१ मते घेत तब्बल १६ हजार ९८० मतांनी चंद्रगुप्त यांना मात दिली होती. पुढे  काळे जालना जिल्ह्याचे खासदारही झाले. 

संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत २६४ आमदारमुंबईसह तयार झालेल्या संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या निवडणुकीत विधानसभेचे २६४ मतदारसंघ होते. त्यातील २१५ जागा जिंकून यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. त्रिंबक भराडे विधानसभा अध्यक्ष झाले. पुढे यशवंतरावांना दिल्लीत जावे लागले. त्यांची जागा मारोतराव कन्नमवार यांनी घेतली; परंंतु ३७० दिवसांच्या कारभारानंतर त्यांचे कार्यालयातच अकाली निधन झाले व वसंतराव नाईक मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यांनी महाराष्ट्रात हरितक्रांती व औद्योगिक क्रांतीही घडविली. 

जिल्ह्यात दोन महिला उमेदवार, एक पराभूतया निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस व भारतीय कम्युनिस्ट पक्षाने प्रत्येकी एका महिलेला उमेदवारी दिली होती. इतर सर्वच पक्षांनी केवळ पुरुषांनाच उमेदवारी दिली. औरंगाबाद जिल्ह्यात एकूण १० मतदारसंघांतून ३२ उमेदवार रिंगणात होते. त्यात सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून सीपीआच्या करुणा चंद्रगुप्त व वैजापूर मतदारसंघातून काँग्रेसच्या गिरजाबाई मच्ंिछद्रनाथ या महिला लढत होत्या. करुणा चंद्रगुप्त यांचा काँग्रेस उमेदवार बाबूराव काळे यांनी पराभव केला, तर गिरजाबाई मच्छिंद्रनाथ यांनी पीएसपीचे उमेदवार किशोर रामेश्वर पवार यांचा पराभव करून विधानसभा गाठली. वैजापूर मतदारसंघाच्या पहिल्या आमदार आशाताई वाघमारे ठरल्या होत्या. दुसऱ्या निवडणुकीत आशातार्इंचा पराभव झाला. वैजापूरकरांनी गिरजाबाई यांच्या रूपाने दुसऱ्यांदा एका महिलेची आमदार म्हणून निवड केली होती. 

औरंगाबाद जिल्ह्यातील आमदारविधानसभा मतदारसंघ    विजयी उमेदवार    पक्ष    मतदानऔरंगाबाद    झकेरिया रफिक बालूमिया    काँग्रेस     १८,७६७पैठण    कल्याणराव पंढरीनाथ    काँग्रेस    १६,९८०गंगापूर    यमाजीराव म्हातारराव    काँग्रेस    २०,६००वैजापूर    गिरजाबाई मच्छिंद्रनाथ    काँग्रेस    २३,८३०कन्नड    काकासाहेब भिकनराव    काँग्रेस    २१,९२६सिल्लोड    बाबूराव जंगलू काळे     काँग्रेस    २६,१७१अंबड    नानासाहेब सावळीराम    काँग्रेस    १०,८३८जालना    दत्तात्रयराव देशपांडे    काँग्रेस    ११,५२४बदनापूर(राखीव)    धकाळेश्वर मकाजी    काँग्रेस    १६,३५७भोकरदन    भाऊराव नरसिंगराव    पीडल्ब्यूपी    ३२,१६१

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Aurangabadऔरंगाबादcongressकाँग्रेसvidhan sabhaविधानसभा