लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: डॉ़शंकरराव चव्हाण विष्णूपुरी प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून दोन दिवसात झालेल्या पावसाने प्रकल्प भरला आहे़ त्यामुळे धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला असून त्यातून विसर्ग सुरु आहे़ पाण्याची आवक वाढल्यास आणखीही दरवाजे उघडण्यात येणार असून नदीकाठावरील नागरीकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे़सोमवारी दुपारी तीन वाजता प्रकल्पाची पाणीपातळी ३५४ मिटर झाली होती़ प्रकल्पात सध्या ६२़२५ दलघमी एवढा पाणीसाठा असून प्रकल्प जवळपास ९० टक्के भरला आहे़ त्यात परभणी जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे ७४१ घ़मी़ वेगाने प्रकल्पात पाण्याचा येवा सुरु आहे़ ताशी २़६६ दलघमी वेगाने पाणीसाठ्यात वाढ होत आहे़ त्यामुळे दुपारी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला असून आणखी दरवाजे उघडण्याची शक्यता आहे़
गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:39 AM