शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

विजय झोलचे खणखणीत शतक; केडन्सविरुद्ध जालना संघाच्या १८७ धावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 12:43 AM

जबरदस्त फार्मात असलेल्या विजय झोल याच्या आणखी एका अफलातून केलेल्या शतकी खेळीमुळे जालना संघाला पुण्याच्या केडन्स संघाविरुद्ध १८७ धावांपर्यंत मजल मारता आली. प्रत्युत्तरात केडन्सने पहिल्या दिवसअखेर ४ बाद २३४ धावा फटकावल्या.

औरंगाबाद : जबरदस्त फार्मात असलेल्या विजय झोल याच्या आणखी एका अफलातून केलेल्या शतकी खेळीमुळे जालना संघाला पुण्याच्या केडन्स संघाविरुद्ध १८७ धावांपर्यंत मजल मारता आली. प्रत्युत्तरात केडन्सने पहिल्या दिवसअखेर ४ बाद २३४ धावा फटकावल्या.शिरपूर येथे एमसीएच्या सुरु असलेल्या सीनिअर लीग क्रिकेट स्पर्धेत प्रथम फलंदाजी करणाऱ्या जालना संघाला युवा फलंदाज ऋषिकेश पांगारकरने रामण्णा नंदागिरीच्या साथीने ३१ धावांची सलामी दिली; परंतु त्यानंतर जालना संघाने ३६ धावांच्या अंतरात त्यांचे ६ फलंदाज तंबूत पाठवले. ६ बाद ६७ अशा स्थितीत जालना संघ धावांचे शतकही गाठतो की नाही, अशी परिस्थिती होती; परंतु सीएनएविरुद्ध १३९ धावांची तडाखेबंद खेळी करणाºया विजय झोलने जालना संघासाठी संकटमोचकाची भूमिका यशस्वीपणे बजावली. समोरून फलंदाज तंबूत परतताना त्याने आक्रमक पवित्रा अवलंबताना बंदुकीच्या गोळीतून सुटावे, असे कव्हर ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह आणि पूलचे सणसणीत चौकार मारताना कॅडेन्सच्या गोलंदाजांवर जोरदार प्रतिहल्ला केला. त्याने विशेषत: डावातील ३0 वे षटक टाकणाºया नितेश सालेकर याच्या सलग चार चेंडूंवर खणखणीत चार चौकार ठोकले. त्यानंतर विजय झोल याने ३९ वे षटक टाकणाºया पारस रत्नपारखी याच्यावर हल्लोबोल करताना या षटकात ३ नेत्रदीपक चौकार आणि एका टोलेजंग षटकारासह १९ धावा वसूल केल्या. विशेष म्हणजे विजय झोल याने या डावात पारस रत्नपारखी यालाच तिन्ही गगनभेदी षटकार ठोकले. अक्षय वाईकर याला चौकार ठोकत शतक साजरे करणाºया विजय झोलमुळे जालना संघाला पहिल्या डावात १८७ धावांपर्यंत मजल मारता आली. जालना संघाकडून विजय झोलने सर्वाधिक ३ षटकार व १४ चौकारांची आतषबाजी करताना १0१ धावांची तडफदार शतकी खेळी सजवली. त्याच्याशिवाय ऋषिकेश पांगारकरने ५ चौकारांसह २८, रामण्णा नंदागिरीने १५ व नचिकेत मुळकने १६ धावांचे योगदान दिले. कॅडेन्सकडून पारस रत्नपारखी याने ८१ धावांत ५ गडी बाद केले. नितेश सालेकर व सिद्धेश वरंघटे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.त्यानंतर हर्षद खडीवाले व पारस रत्नपारखी यांनी केलेल्या ११२ धावांच्या भागीदारीच्या बळावर कॅडेन्सने दुसºया डावात ४ बाद २३४ धावा करीत त्यांची स्थिती भक्कम केली. कॅडेन्सकडून हर्षद खडीवालेने ९ चौकार व २ षटकारांसह ७४ व पारस रत्नपारखीने १२ चौकारांसह ८0 धावा केल्या. ऋषिकेश मोटकर ३0 धावांवर खेळत होता. जालना संघाकडून सय्यद शोएब व नचिकेत मुळक यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.संक्षिप्त धावफलकजालना (पहिला डाव) : सर्वबाद १८७. (विजय झोल १0१, ऋषिकेश पांगारकर २८, नचिकेत मुळक १६, रामण्णा नंदागिरी १५. पारस रत्नपारखी ५/८१, नितेश सालेकर २/४२, सिद्धेश वरघंटे २/१२).कॅडेन्स : ४ बाद २३४. (पारस रत्नपारखी खेळत आहे ८0, हर्षद खडीवाले ७४, ऋषिकेश मोटकर खेळत आहे ३0. सय्यद शोएब २/४0, नचिकेत मुळक २/४७).