वाळूज महानगर : वाळूजच्या विजयनगरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघाला आहे. या वसाहतीत ग्रामपंचायतीने नळ योजना कार्यान्वित केल्यामुळे मंगळवारी पहिल्यांदाच नळाला पाणी आल्यामुळे नागरिकांनी जल्लोष केला.
या भागातील पाणी प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी सरपंच पपीन माने यांनी पुढाकार घेऊन नवीन जलवाहिनी टाकण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम ग्रामपंचायतीने पूर्ण केल्यामुळे अनेक नागरिकांनी नळ कनेक्शन घेण्यासाठी ग्रामपंचायतीकडे अनामत रक्कम जमा केली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्यावतीने अनामत रक्कम भरणाऱ्या नागरिकांना नळजोडणी देण्यात आली आहे. या भागातील नळाला मंगळवारी पाणी पुरवठा करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते रतन अंबीलवादे, अनिल भुजंग, सिमा थोरात, शोभाबाई जाधव, शिल्पा जाधव, सुजाता बागुल, सुरेखा वंजारे, मनिषा हिवाळे, राधाबाई पोपळघट, संगिता त्रिभुवन, छाया त्रिभुवन, जयश्री थोरात, सुजाता बागुल, शालु थोरात, जया थोरात, वर्षा चव्हाण, विठ्ठल त्रिभुवन, रईसाबी शेख आदी उपस्थित होते.