परिषदेच्या डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृहात मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबादच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या सर्वसाधारण सभेत साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्याहस्ते हा सत्कार सोहळा पार पडला.
यावेळी कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे, डॉ. शेषराव मोहिते, डॉ. ऋषिकेश कांबळे, आसाराम लोमटे, दगडू लोमटे, राम तिरूके, डॉ. सतीश साळुंके, हेमलता पाटील, डॉ. रामचंद्र काळुंखे, संतोष तांबे, दिलीप बिरूटे, जीवन कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
सिंदगीकर यांनी कथा-कवितांच्या माध्यमातून ग्रामीण, दलित, आदिवासी समाजाचे दु:ख आणि वेदना मोठ्या ताकदीने मांडल्या आहेत. ग्रामीण भागात राहून ग्रामीण जीवनाचे चित्रण ते नेहमीच कथा-कवितांच्या स्वरूपात मांडत आहेत. त्यांचे साहित्य रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवित असून ते मराठवाडा साहित्य परिषदेचे भूषण आहेत, अशा शब्दांत ठाले पाटील यांनी सिंदगीकर यांचे कौतुक केले.
या पुरस्काराचे श्रेय मराठवाडा साहित्य परिषदेलाही जाते, अशा शब्दांत सिंदगीकर यांनी मनोगत व्यक्त केेले.
डॉ. दादा गोरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. किरण सगर यांनी संचालन केले.
फोटो ओळ :
साहित्यिक विलास सिंदगीकर यांचा सत्कार करताना कौतिकराव ठाले पाटील आणि इतर मान्यवर.