शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

आडगावकरांना सॅल्यूट! १९३७ पासून आतापर्यंत दिले १६१ सैनिक, ७२ जावईदेखील सैनिकच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 7:26 PM

देशसेवेत दाखल होण्याचा पहिला मान फकीरराव हैबतराव भोसले यांना

- मुबीन पटेलपिशोर (छत्रपती संभाजीनगर) : देशसेवेचा वसा घेऊन भारतीय सैन्य दलात सर्वाधिक सैनिक देणारे जिल्ह्यातील गाव म्हणून कन्नड तालुक्यातील आडगाव (पिशोर) या गावाची ओळख आहे. या गावाने आजपर्यंत तब्बल १६१ सैनिक देशसेवेसाठी दिलेले आहेत.

दरवर्षी सुमारे पाच ते सात तरुण सैन्यदलात दाखल होऊन सीमेवर कर्तव्य बजावतात. आजमितीस सुमारे १६१ तरुण सैनिक म्हणून भरती झाले आहेत. आतापर्यंत ७२ माजी सैनिक झालेले आहेत. यापैकी हयात असलेले ४३ जण तरुणाईला सैन्यदलात भरती होण्यासाठी प्रेरित करत असतात. तसेच या गावातील ७२ जावईदेखील सैनिक आहेत. देशसेवेचे व्रत घेतलेल्या या गावाने एकुलत्या एका मुलालाही देशसेवेसाठी पाठवल्याचे उदाहरण आहे.

गावातील ४३ माजी सैनिकांचे मार्गदर्शनया गावातील ४३ माजी सैनिक सध्या गावातील तरुणांना सैन्यात भरती होण्याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. यात भरती होण्यासाठी काय करावे, मैदानी चाचणीची तयारी, लेखी परीक्षा या सर्व बाबींची इत्यंभूत माहिती हे माजी सैनिक तरुणांना देतात. त्याचा या तरुणांना दरवर्षी भरती प्रक्रियेच्या वेळी फायदा होतो.

टाकळी शाहू गावानेही घेतला आदर्शआडगाव पिशोर या गावाचा आदर्श समोर ठेवून या गावाच्या शिवारालगत असलेल्या टाकळी शाहू गावानेसुद्धा ४४ सैनिक आजवर देशसेवेसाठी पाठवले आहेत. या गावातील तरुणांनाही देशसेवेची ओढ लागलेली असून, आजही अनेक तरुण सैन्य भरतीची तयारी करीत आहेत.

देशसेवेची प्रेरणा गावाला कोठून भेटली?या गावातील फकिरराव हैबतराव भोसले यांच्याकडून प्रत्येकाला देशसेवेची प्रेरणा मिळाली. १९३७ पासून हा सिलसिला सुरूच आहे.

देशसेवेत दाखल होण्याचा पहिला मान फकीरराव हैबतराव भोसले यांनातीन हजार लोकसंख्या असलेल्या आडगाव (पिशोर) या गावात सैन्य दलात दाखल होण्याचा पहिला मान फकीरराव हैबतराव भोसले यांना जातो. स्वातंत्र्यपूर्व काळात १९३७ साली ते सैन्य दलात भरती झाले होते. त्यांनी नंतर पोलिस खात्यात कर्तव्य बजावले व पोलिस उपअधीक्षक म्हणून ते सेवानिवृत्त झाले.

सैनिकांचे कुटुंबीय म्हणतात....एकुलता मुलगा सेवेतआमच्या गावातील प्रत्येक तरुण देशभक्तीने प्रेरीत आहे. सैनिकांची परंपरा खंडित होऊ न देण्याचा आम्ही पण केलेला असून, मी माझा एकुलता एक मुलगा समाधान याला देशसेवेसाठी पाठविले आहे.- हरिभाऊ भोसले, माजी सरपंच

तिसरी पिढी सैन्यातफकीरराव भोसले यांच्यापासून प्रेरणा मिळाली. १९६९ साली सैन्यात भरती झालो. आमच्या कुटुंबातील आठ भाऊ निवृत्त झालो असून, आमची तिसरी पिढी माझ्या नातूच्या रूपाने सध्या देशसेवा करीत आहे.- मंजितराव भोसले, माजी सैनिक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादIndian Armyभारतीय जवानSoldierसैनिक