शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

ग्रामीण खेळाडूंचाच मिळाला कबड्डीला आधार

By admin | Published: July 15, 2014 12:15 AM

भास्कर लांडे, हिंगोली ग्लॅमर व व्यावसायिकतेचा ‘टच’ नसल्यामुळे क्रीडा संघटनेसहीत क्रीडा कार्यालय आणि प्रेक्षकांनी देखील कबड्डीकडे पाठ फिरविली;

भास्कर लांडे, हिंगोलीग्लॅमर व व्यावसायिकतेचा ‘टच’ नसल्यामुळे क्रीडा संघटनेसहीत क्रीडा कार्यालय आणि प्रेक्षकांनी देखील कबड्डीकडे पाठ फिरविली; परंतु अस्सल देशी खेळावर जीवापाड प्रेम करणाऱ्या ग्रामीण भागातील गुणवत्तापुर्ण खेळाडूचांच आधार मिळाल्याने हिंगोली जिल्ह्यात कबड्डी हा खेळ जिवंत राहिला आहे. आजघडीला कोणत्याही प्रकारे व्यवसायिकतेचा बाज नसताना केवळ प्रेमापोटी ग्रामीण भागात कबड्डी खेळली जाते; पण शहरी भागातून अधोगतीला लागलेल्या या खेळाच्या विकासासाठी एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.एकेकाळी हिंगोली जिल्ह्याने कबड्डीची पताका राज्यभरात फडकाविली होती. २००२ मध्ये राज्यात उपविजेता ठरल्याने हिंगोलीचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोहोचले होते. तद्नंतर या खेळाचा विकास होण्याऐवजी अधोगती होत गेल्याने जिल्हा संघाला उल्लेखणीय कामगिरी करण्यात अपयश आले. परिणामी शहरी भागातून हा खेळ मागे पडत गेल्याने काही गावापुरताच आज कबड्डी हा खेळ सिमीत राहिलेला आढळतो. अशा विपरित परिस्थितीत जिल्ह्यातील दांडेगाव, खरबी, सावा, भांडेगाव, इसापूर रमना, पेडगाव, भांडेगाव, केंद्रा खु, मुर्तजापूर सावंगी, वाखरी, रामेश्वर तांडा वाईतील खेळाडूंनी हा खेळ जिवंतच ठेवला नसून तर तो फुलविला देखील आहे. ताकद आणि गुणवत्तेचा खजाना असलेल्या येथील खेळांडूकडे कोणाचेही लक्ष नाही. क्रीडा संघटना आणि खेळाडूंचा विसंवाद असताना क्रीडा कार्यालयाला त्याचे सोयरसुतक राहिलेले नाही. ओतप्रोत गुणवत्ता असलेल्या येथील खेळाडूंना करिअरकडे पाहण्याची दृष्टी नाही. तशी जाणीव करून देणाऱ्या प्रशिक्षकांचा अभाव असल्याचे राष्ट्रीय कबड्डीपटू समीर अमोदी यांनी सांगितले. केवळ यात्रा-जत्रा आणि राजकीय मंडळींचे वाढदिवस सोडले तर व्यावसायिक स्पर्धा, शालेय स्पर्धा, शासनस्तरावरील संधीची माहिती येथील खेळाडूंना नसते. केवळ खेळावर प्रेम आणि आनंदापोटी ग्रामीण भागात कबड्डी खेळली जाते. खेळता खेळता करिअरचे वय निघून गेलेले या खेळाडंूना कळत नाही. वर्षानुवर्ष असेच निघून जात असताना क्रीडा संघटना आणि क्रीडा कार्यालयाने या खेळांडूकडे उघड्या डोळ्यांनी पाहण्याची गरज असल्याचे क्रीडा शिक्षक कैलास शैव यांनी सांगितले. क्रीडा व युवक कल्याणचा फंड संघटना आणि खेळाडूंच्या विकासासाठी द्यावा, तज्ज्ञ प्रशिक्षकांची नियुक्ती करावी, नियमित अंतराने खेळाडूंसाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करावीत, नवनवीन बाबीचा स्वीकार केल्याशिवाय कबड्डीचा विकास होणार नाही. सद्य:स्थितीत जिल्ह्यात उलट परिस्थीती असल्याने जिल्हा क्रीडा संकुलाची दयनीय अवस्था झालेली आहे. त्यातच दरवर्षी येणारे अनुदान व्यायाम शाळेला देवून क्रीडा कार्यालय मोकळे होते. दुसरीकडे अगणित खेळांचा समावेश शालेय क्रीडा प्रकारात केल्याने कबड्डीकडे पहायला शिक्षकांना वेळ नाही. जरी वेळ असला तरी वसमत सोडले तर एकाही तालुक्याच्या ठिकाणी कबड्डीचे मैदान नाही. एकदाच सर्व संकटे ओढवल्याने कबड्डीची अवस्था बिकट झाली. परिणामी बोटावर मोजता येतील एवढी गावांनी कबड्डी खेळ जिवंत ठेवला. लवकर या भागाकडे पाहिले नसल्यास कबड्डी जिल्ह्यातून इतिहास जमा होण्याची भीती आहे. नव्या बदलांचा अंगीकार जिल्ह्यातील कबड्डी मागे पडू नये, म्हणून नव्या बदलांचा अंगीकार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानुरूप खेळाडूंच्या सरावासाठी दोन मॅट उपलब्ध झाल्या आहेत. हिंगोलीतील आदर्श महाविद्यालयात असलेल्या या मॅटचा वापर स्पर्धांमध्ये केला जातो. जिल्हा संघटनेकडून खेळाडूंसाठी ७ दिवसांचे सराव शिबीर घेण्यात येते. वर्षभरात विविध स्पर्धा घेण्यात येतात. जिल्ह्यातील संघही परजिल्ह्यात तसेच राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील खेळासाठी पाठविले जातात. गतवर्षी २ खेळाडूंनी राज्य पातळीवर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व केले. दुसरीकडे कुमार गटाने राष्ट्रीय पातळीवर उपविजेते पदापर्यंत मजल मारली होती. पाच वर्षांपूर्वी आयपीएलच्या धरतीवर जिल्ह्यात कबड्डी प्रिमीयर लीगचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सध्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा सत्कार दरवर्षी केला जातो. खेळाडूंना नवीन स्पर्धांची माहिती, संधी दिली जाते. म्हणून आजही जिल्ह्यात कबड्डी जीवंत असून अधिक विकासासाठी संघटनेची धडपड चालू असते, असे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष माजी खा. अ‍ॅड. शिवाजीराव माने यांनी सांगितले.