दावरवाडी : पैठण तालुक्यातील गावागावांत हरघर हरनळ योजना राबविण्यात येणार असून नागरिकांना शुद्ध पेयजल मिळणार आहे. अर्थात या योजनेने पैठण तालुका सुजलाम् सुफलाम् होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे फलोत्पादन तथा रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी केले.
हर्षी (बु) ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकासकामांचे भूमिपूजन व ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना व वाॅटरग्रिड योजना कार्यान्वित केल्याबद्दल मंत्री भुमरे यांचा हा नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती विलास भुमरे, जिल्हा परिषदेचे सदस्य कमलाकर एडके, पाचोड सरपंच शिवराज भुमरे, सरपंच संदीपराव घायाळ, सचिन घायाळ, नंदकुमार पठाडे, जगन्नाथ दुधे, तंटा समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव घायाळ, सचिन वाघ, विश्वंभर भावले, दादेगावचे सरपंच अनिल हजारे, महादेव हजारे, सुरेंद्र गव्हाणे, आदींची उपस्थिती होती.