शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

गावठी कट्टा विकणारा पोलिसांच्या जाळ्यात

By admin | Published: September 08, 2015 12:16 AM

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरात गावठी कट्टा विक्रीसाठी ग्राहकांचा शोध घेणाऱ्याला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी सोमवारी दुपारी शिताफीने अटक केली.

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरात गावठी कट्टा विक्रीसाठी ग्राहकांचा शोध घेणाऱ्याला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी सोमवारी दुपारी शिताफीने अटक केली. त्याच्याकडून एक गावठी कट्टा व मोबाईल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे या इसमाला दीड वर्षापूर्वी ५ कट्टे बाळगताना गुन्हे शाखेने अटक केली होती. सिडको वाळूज महानगरात एक इसम गावठी कट्टा विक्री करण्यासाठी ग्राहकाचा शोध घेत असल्याची गुप्त माहिती फौजदार टाक यांना मिळाली. टाक व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून त्या संशयितास अटक केली. झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी कट्टा आढळला. त्याने आपले नाव कर्तारसिंग लोधी (४०, रा. मोहगाव, जि. भिंड, मध्य प्रदेश, ह. मु. आंबेडकरनगर बजाजनगर परिसर) असल्याचे सांगितले. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात, फौजदार एम. बी. टाक, सहा. फौजदार दत्तात्रय साठे, पोहेकॉ. रामदास गाडेकर, पोकॉ. गोकुळ, वाघ, बाळासाहेब आंधळे, अनिल तुपे, अनिल पवार, अनिल कदम आदींच्या पथकाने केली. दीड वर्षापूर्वीही...लोधी यास दीड वर्षापूर्वी वाळूज औद्योगिक क्षेत्रात गुन्हे शाखेने पकडले होते. त्यावेळी लोधीच्या ताब्यातून पाच गावठी कट्टे, १२ जिवंत काडतुसे व ४ रिकाम्या काडतुसांच्या पुंगळ्या असा ऐवज जप्त करण्यात आला होता. त्याचे दोन साथीदार प्रशांत पठारे (जोगेश्वरी) व महेंद्र वाघ (रा. वैजापूर) या दोघांना अटक झाली होती.मध्यप्रदेशातून तस्करीवाळूज औद्योगिक परिसरात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आरोपी मध्य प्रदेशातून दीड-दोन हजार रुपयांत गावठी कट्टे आणत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ४ सप्टेंबरला कट्टा विक्रीच्या प्रकरणातून एका तरुणाचे अपहरण करून ३५ हजारांची खंडणी उकळण्यात आली होती. त्यात नगरसेवकाच्या मुलाचा सहभाग असल्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात यांनी सांगितले.