शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
4
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
5
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
6
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
7
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
8
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
9
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
10
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
11
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
12
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
13
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
15
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
16
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
17
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
18
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
19
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
20
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."

औरंगाबादच्या सभेत अटींचे उल्लंघन; राज ठाकरेंविरोधात दोषारोपपत्र दाखल; पोलिसांकडून नोटीस 

By बापू सोळुंके | Published: August 25, 2022 12:32 PM

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील १ मेच्या सभेत १२ अटींचे उल्लंघन झाल्याने सभा आयोजक आणि राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. 

औरंगाबाद: मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर 1मे रोजी झालेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेत अनेक अटी, शर्ती चे उल्लंघन केल्याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. याप्रकरणी आता पोलिसांनी राज ठाकरे यांच्यासह संयोजकाविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे. तसेच ठाकरे यांना पोलिसांनी कलम 41(1)नुसार नोटीस बजावली आहे. राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील १ मेच्या सभेत १२ अटींचे उल्लंघन झाल्याने सभा आयोजक आणि राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. 

महाराष्ट्र दिनी राज ठाकरे यांची औरंगाबादेत सभा झाली. सभेला काही अटींवर परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे सभेच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांकडून या भाषणासंबंधीचा सर्व डेटा गोळा करण्यात आला. तसेच सभेच्या ठिकाणी कोणत्या अटींचं पालन झालं कशाचं उल्लंघन झालं, याविषयीचा अहवाल तयार करण्यात आला. हा अहवाल गृहखात्याकडे पाठवण्यात आला. त्यानंतर अटींचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्याने राज ठाकरे तसेच आयोजकांविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आता याप्रकरणी पोलिसांनी राज ठाकरे यांच्यासह संयोजकाविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे. याप्रकरणी ठाकरे यांना पोलिसांनी कलम 41(1)नुसार नोटीस बजावली आहे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेAurangabadऔरंगाबाद