औरंगाबाद: इन्स्टाग्रामवर भेट झालेल्या मित्राने पुण्यातील शिक्षिकेला लग्नाचे आमिषाने औरंगाबादेत बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले. एप्रिल महिन्यात समर्थनगर येथील फ्लॅटवर झालेल्या अत्याचाराविषयी तरूणीने दिलेल्या तक्रारीवरून क्रांतीचौक पोलीस ठाण्यात आरोपी तरूणाविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला.
सतीश भगवान घोरपडे(रा. समर्थनगर, मूळ रा.परभणी) असे गुन्हा नोंद झालेल्या तरूणाचे नाव आहे. आरोपी हा स्पर्धा परिक्षेची तयारी करतो तर तक्रारदार ही पुण्यात शिक्षिका आहे. तक्रारदार तरूणीचे इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर अकाऊंट आहे. फेब्रुवारी महिन्यात तिला सतीशने फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. त्याचे प्रोफाईल पाहिल्यानंतर पंधरा दिवसानंतर तिने सतीशची फ्रेंड रिक्वेस्ट मान्य केली. दोघे परस्परांना मेसेज पाठवू लागले. दरम्यान त्याने तिचा मोबाईल नंबर घेतला. यानंतर दोघे व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवू लागले, फोनवर बोलू लागले.
या दरम्यान सतीशने त्याचे तिच्यावर प्रेम असल्याचे आणि तिच्याशिवाय तो जगू शकत नसल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर दोघे लग्न करू आणि आयुष्यभर जीवनसाथी म्हणून राहू असे तो म्हणाला. त्याचा लग्नाचा प्रस्ताव तिने स्विकारला. १४ एप्रिल रोजी सतीशने तिला भेटण्यासाठी औरंगाबादेत बोलावले. याकरीता त्याने तिचे बसचे तिकिटही पाठविले होते. ती औरंगाबादेत आल्यानंतर सतीशने तिला समर्थनगर येथील त्याच्या फ्लॅटवर नेले. तेथे त्याच्या मित्रांसोबत तिची ओळख करून दिल्यानंतर त्याचे मित्र फ्लॅटमधून बाहेर गेले. तेव्हा सतीशने तिच्यासोबत बळजबरीने शरिरसंबंध ठेवल्याचे तरूणीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले. सतीश लग्न करणार असल्याने त्याच्यावर विश्वास ठेवून तिने याविषयी तक्रार केली नव्हती. दुसºया दिवशी त्याने तिला पुण्याला नेऊन सोडले. यानंतर पुणे येथेही तरूणीच्या घरी त्याने तिच्यावर अत्याचार केला.
तरूणीकडून उकळले ६० हजार रुपयेसतीश तिच्याकडे नवीन मोबाईल घेण्यासाठी पैशाची मागणी केली. यावरून त्यांचे भांडणही झाले होते. त्याने तिच्याकडून ६०हजार रुपये उकळले. तो तिला बदनामी करण्याची धमकी देवू लागला.मात्र सोसायटीत बदनामी होईल म्हणून तरूणीने याविषयी कोणाकडेही वाच्यता केली नाही.लग्नास नकार,देत केली मारहाणलग्न करणार म्हणून त्याला सर्वस्व देणा-या तरूणीचा शेवटी सतीशने विश्वासघात केला. सिनेमाला गेल्यानंतर त्याचे दिवाळीमध्ये दुस-या मुलीसोबत लग्न असल्याचे तिला म्हणाला. यावेळी झालेल्या भांडणात त्याने तिला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर तो औरंगाबादला निघून आला. यानंतर तरूणीने सिंहगड ठाण्यात गुन्हा नोंदविला. घटना औरंगाबादची असल्याने पुणे पोलिसांनी हे प्रकरण क्रांतीचौक पोलिसांकडे वर्ग केल्याची माहिती पोलीस निरीक्षक उत्तम मुळक यांनी दिली.