बेगमपुरा
पाथरवट समाज तसेच श्रीराम भजनी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने विश्वकर्मा यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी त्र्यंबकराव कासोटे, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीनिवास जोशी, संतोष निमोणे यांची प्रमुख उपस्थिती होती. आरती व प्रसाद वाटपाने कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रकाश परदेशी, दीपक पटेल, भगवान निमोने, काळूराम बेलेवार, सुरेश परदेशी, राजू निमोणे, कैलास परदेशी, विठ्ठलराव चव्हाण, गजेंद्र कसाटे आदींची उपस्थिती होती.
सातारा परिसर
जय विश्वकर्मा सर्वोदय संस्थाच्यावतीने सातारा परिसरातील द्वारकादासनगर येथे विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मंदाकिनी चौकडे यांच्याहस्ते पूजन केले. डॉ. स्वाती काळे, डॉ. ऐश्वर्या जोध, नीशा कदम, शीला दाभाडे आदींसह मान्यवरांनी अभिवादन केले.
मुकुंदवाडी
विश्वकर्मा युवा एकत्रिकरण बचत गटातर्फे प्रभू विश्वकर्मा जयंती मुकुंदवाडी जिजाऊनगर येथे साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रा. पांडुरंग हिवाळे, प्रशांत हरेल यांनी लोहार समाजाच्या विकासाची दिशा यावर मार्गदर्शन केले. संदीप वैद्य, दीपाली वैद्य, दुर्गादास वैद्य, प्रा. राजू पोपळघट, गणेश तांबे, आशिष हरेल, योगेश कव्हळे, दीपक कव्हळे, प्रवीण बाधले, दत्ता बाधले आदींनी परिश्रम घेतले.