शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

औरंगाबाद जिल्ह्याचे ‘व्हिजन-२०२०’ फसले; ‘व्हिजन-२०३०’ची तयारी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 11:49 AM

१० वर्षांपूर्वी तयार केलेले दस्तावेज झाले कालबाह्य 

ठळक मुद्देशहरासह जिल्ह्यात समस्यांचे डोंगरजिल्ह्याचा कायापालट झालाच नाहीसर्व यंत्रणांनी एकत्रित काम करणे गरजेचे

- विकास राऊत

औरंगाबाद : जिल्ह्यासह शहरातील पर्यटन, दळणवळण, नागरी सेवा-सुविधा आणि औद्योगिक क्रांतीमध्ये अग्रेसर करण्यासाठी २०१० मध्ये जिल्हा प्रशासनाने तयार केलेले ‘व्हिजन डॉक्युमेंट-२०२०’ राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीअभावी रद्दीत जमा झाले आहे. कागदावरच राहिलेल्या या डॉक्युमेंटचा (दस्तावेज) सध्या काहीही विचार होत नसून २०२० साल २० दिवसांवर आले आहे. नागरी सुविधांशी निगडित यंत्रणांनी ‘व्हिजन डॉक्युमेंट-२०२०’चा काहीही विचार न केल्याने आता ‘व्हिजन-२०३०’अशी घोषणा होण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. 

दहा लाख कुशल मनुष्यबळ, अडीच लाखांहून अधिक रोजगार निर्मिती करण्यासोबतच कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून जिल्ह्याचा कायापालट करण्याचे उद्दिष्ट ठरवून तयार करण्यात आलेले ‘व्हिजन-२०२०’ आता कालबाह्य झाले आहे. जिल्ह्याचे व्हिजन डॉक्युमेंट तत्कालीन जिल्हाधिकारी कुणालकुमार यांच्या काळात तयार करण्यात आले होते. त्याचा प्राथमिक आराखडा सेवानिवृत्त सनदी अधिकारी के. बी. भोगे यांच्या काळात समोर आला होता. कुणालकुमार त्यांच्या बदलीनंतर जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी त्याकडे लक्ष दिले, परंतु त्यांच्या बदलीनंतर जिल्हा प्रशासन, महापालिका आयुक्तांना त्या व्हिजनकडे लक्ष देता आले नाही. 

‘व्हिजन-२०२०’ चा मसुदा तयार करण्यासचे काम जिल्हा प्रशासनाने २०१० मध्ये हाती घेतले होते. तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी विविध सरकारी यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, तज्ज्ञ मंडळी यांच्या मदतीने मसुदा तयार केला होता. जिल्ह्याचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी विविध क्षेत्रातील १६ तज्ज्ञ, अधिकारी व नागरिकांच्या समित्यांची स्थापना करण्यात आली होती. सरकारी यंत्रणा, नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या बैठका व कार्यशाळा घेतल्या. सर्वांच्या मतांचा अंतर्भाव डॉक्युमेंटमध्ये करण्यात आला होता. ते व्हिजन जिल्ह्याचे असले तरी त्याचा  फायदा शहर व मनपा हद्दीला होणार होता. शहराची लोकसंख्या सध्या १८ लाखांच्या पुढे सरकली आहे. झालर क्षेत्रातील २८ गावांतही बांधकामे वाढली आहेत. आगामी काळात ही गावे प्राधिकरणाच्या रेट्याखाली येतील. त्यामुळे वाढणाºया लोकसंख्येला सुविधा देण्याची जबाबदारी पालिका व प्राधिकरणावर असणार आहे. यासाठी ‘व्हिजन-२०२०’ डॉक्युमेंट महत्त्वाचे ठरले असते. परंतु त्याकडे मागील १० वर्षांत दुर्दैवाने दुर्लक्ष झाले. 

सर्व यंत्रणांनी एकत्रित काम करणे गरजेचे‘व्हिजन-२०२०’ याबाबत मनपा, जिल्हा प्रशासनाने एकत्रित काम करणे गरजेचे होते. मुळात शहराला अग्रेसर करण्यासाठी मनपाची भूमिका महत्त्वाची असते. व्हिजन डॉक्युमेंट समोर ठेवून पालिका काहीही निर्णय घेत नाही. शहराचा विचार करीत नाही. शहर, जिल्हा विकासासाठी जेव्हा एखादे मॉडेल तयार होते. तेव्हा त्यासाठी अनुदानाची तरतूद करावी लागते. त्यानुसार कामांचे नियोजन झाले तर व्हिजनला ‘दृष्टी’ मिळते, असे मत सेवानिवृत्त सनदी अधिकारी के. बी. भोगे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद