लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राजकारणात करिअर करण्यासंदर्भात सुरू होणाऱ्या विशेष अभ्यासक्रमाच्या निर्मितीसाठी समितीचे सदस्य पुणे, जालंदर येथे दौरा करणार आहेत. हा निर्णय यासंदर्भात स्थापन केलेल्या समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीत ट्रेनिंग स्कूल फॉर एंट्रन्स इन पॉलिटिक्स हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा ठराव मंजूर केला होता़ या अभ्यासक्रमासंदर्भात राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य डॉ. जितेंद्र देहाडे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली आहे. या समितीची पहिली बैठक बुधवारी (दि.२७) पार पडली. यावेळी सदस्य डॉ. बाबासाहेब कोकाटे, प्रा. राहुल म्हस्के, पंकज भारसाखळे, शेख जहूर यांची उपस्थिती होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी युवकांना संविधानाचे ज्ञान आणि राजकीय समज यावी यासाठी १९५६ साली मुंबई येथे ‘ट्रेनिंग स्कूल आॅफ इंटरेन्स इन पॉलिटिक्स’ नावाने संस्था सुरू केली होती. अशा प्रकारचा अभ्यासक्रम पुण्यातील एमआयटी अभिमत विद्यापीठ आणि पंजाबमधील जालंदर येथे सुरू आहे. हा अभ्यासक्रम कशा पद्धतीने राबविण्यात येतो, याची माहिती, पाहणी करण्यासाठी समिती दौरा करणार आहे. याशिवाय खासगी संस्थेमार्फत डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर) तयार करणे, कोणता कोर्स सुरू करावा, वरिष्ठ प्राध्यापकांच्या सूचना मागविणे, यासाठी निधी उपलब्ध करणे आदींविषयी चर्चा झाल्याची माहिती डॉ. देहाडे यांनी दिली.शिक्षणतज्ज्ञांची घेणार मतेविद्यापीठात राजकीय करिअर करण्यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेप्रमाणे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य एम. ए. वाहूळ, प्राचार्य आर. के. क्षीरसागर यांनी विद्यापीठाला सविस्तर अहवाल सादर केला होता. यामुळे समिती सदस्य डॉ. बाबासाहेब कोकाटे यांनी या सर्वांचा उल्लेख करत त्यांनाही प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची मागणी केली. यावर सर्वानुमते या दोघांसह विचारवंत रावसाहेब कसबे, डॉ. हरी नरके आदींकडून मते मागविण्याचा निर्णय झाल्याचे डॉ.देहाडे यांनी स्पष्ट केले.
राजकीय प्रशिक्षण संस्थेच्या निर्मितीसाठी समितीचा दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 12:26 AM
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राजकारणात करिअर करण्यासंदर्भात सुरू होणाऱ्या विशेष अभ्यासक्रमाच्या निर्मितीसाठी समितीचे सदस्य पुणे, जालंदर येथे दौरा करणार आहेत. हा निर्णय यासंदर्भात स्थापन केलेल्या समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ : शैक्षणिक, राजकीय क्षेत्रांतून मागविणार मते