वाळूज महानगर : दिल्लीतील सनदी अधिकारी व शहराच्या पोलीस आयुक्तांनी शुक्रवार राष्टÑपती पुरस्कार प्राप्त आदर्श पाटोदा गावाला भेट देऊन पाहणी केली. गावात राबविण्यात आलेल्या विविध कल्याणकारी उपक्रमांची प्रशंसा करुन या अधिकाऱ्यांनी पाटोदा गावाचा आदर्श इतरांनी घेण्याचे आवाहन केले.
केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाचे उपसंचालक उदय सिन्हा, अजित शुक्ला व पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी शुक्रवारी पाटोदा गावाला भेट दिली. याप्रसंगी सनदी अधिकाºयांचा ग्रामपंचायतीच्यावतीने सत्कार करण्यात आला.या गावात लोकसहभागातून विविध लोककल्याणकारी उपक्रम राबविण्यात आले आहे. शासनाच्या विविध निधीतून तसेच ग्रामपंचायतीला मिळणाºया करातुन गावात विविध विकास कामे करण्यात आली आहे.
याची पाहणी अधिकाºयांनी केली. त्यानंतर त्यांनी सरपंच भास्कर पा. पेरे, उपसरपंच विष्णू राऊत, ग्रामविकास अधिकारी पी. एस. पाटील व ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला. ग्रामपंचायतीच्या व्हिजीट रजिस्टरमध्ये या अधिकाºयांनी नोंदी करुन स्वच्छ व सुंदर पाटोदा गावाचे कौतुक केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्यकल्याण पेरे, किशोर पेरे, चंदनसिंग महेर, पुनम गाडेकर, संगिता जमधडे, वर्षा भाग्यवंत, पुष्पा पेरे, मिराबाई पवार, दिपाली पेरे, संजय सोनवणे आदी उपस्थित होते.