शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

पाहुण्या ‘फ्लेमिंगो’चे माजलगावमध्ये आगमन; पक्षीपे्रमींना मेजवानी

By admin | Published: June 05, 2016 11:56 PM

पुरुषोत्तम करवा , माजलगाव येथील माजलगाव धरणात परदेशी पक्षी फ्लेमिंगो (रोहित) नुकतेच दाखल झाले आहेत. या पक्ष्यांचे मनमोहक थवे पाहण्यासाठी शहरातील नागरिकांची धरणावर गर्दी होत आहे.

पुरुषोत्तम करवा , माजलगावयेथील माजलगाव धरणात परदेशी पक्षी फ्लेमिंगो (रोहित) नुकतेच दाखल झाले आहेत. या पक्ष्यांचे मनमोहक थवे पाहण्यासाठी शहरातील नागरिकांची धरणावर गर्दी होत आहे. डिसेंबर ते मे महिन्यात भारतभेटीवर येणाऱ्या पक्ष्यात सर्वात रूबाबदार पक्षी म्हणून फ्लेमिंगोची ओळख आहे. धरणामध्ये हे पक्षी आल्याने पक्षीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ते धरण परिसरात दिवसभर तळ ठोकुन असून पाण्यात बसलेल्या, उडत्या मनमोहक फ्लेमिंगोचे थवे कॅमेऱ्यात कैद करत आहेत. धरणामध्ये शांतता, खाण्यासाठी छोटे मासे, शैवाळ आदी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आले आहे. मराठवाड्यातील बहुतेक प्रकल्पात पाणी नसल्याने व सर्वत्र मोठमोठे प्रकल्प कोरडे पडू लागल्याने हे मोठ्या पाणवठ्याच्या शोधात यंदा प्रथमच माजलगाव धरणावर आल्याचे पक्षीतज्ज्ञ सांगत आहेत. या पक्ष्यांचा मुक्काम पाऊस पडण्याच्या अगोदर हलणार असल्याने हौशी माजलगावकर व आजूबाजूचे पक्षीप्रेमी स्मार्ट फोन, कॅमेरे, दुर्बिणद्वारे रूबाबदार फ्लेमिंगोचे निरीक्षण करत आहेत. या पक्ष्यांच्या आगमनामुळे अनेकांना या पक्ष्यांचा अभ्यास करणे सोपे झाले आहे. (वार्ताहर)फ्लेमिंगो पक्षी उत्तर मध्य आशिया, पूर्व युरोप, सायबेरिया आफ्रिका, आॅस्ट्रेलिया देशांतून भ्रमण करत करत भारतात येतात. महाराष्ट्रातील उजनी, कोयना, पैठण, विष्णूपुरी जलाशयात या पाहुण्यांचे निरीक्षण करण्याची व्यवस्था केलेली आहे. ४माजलगाव धरणात पक्षी निरीक्षणाची सोय नसल्याने दूर अंतरावरून निरीक्षण करावे लागत आहे. एकाच वेळी थव्याने भरारी घेणारा मनमोहक क्षण फ्लेमिंगो माजलगावकरांना भुरळ घालत आहेत.