शेख सलीम शेख सुलेमान (४०, रा.दौलताबाद) यांची करोडी शिवारात विटभट्टी आहे. या विटभट्टीवर शेख सलीम हा भट्टी रचण्याचे काम करतो. या कामासाठी भट्टीमालक शेख सलीम यांनी त्याला २६ हजार रुपयांची आगाऊ रक्कमही दिलेली आहे. मात्र, पंधरा दिवसांपासून सलीम कामासाठी विटभट्टीवर येण्यास टाळाटाळ करीत होता. दरम्यान, बुधवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास भट्टीमालक शेख सलीम हे साजापूर चौफुलीवर चहापानासाठी गेले असता त्यांना तो हा दिसला. यावेळी मालक शेख सलीम यांनी तुला कामावर यायचे नसेल तर माझी आगाऊ घेतलेली रक्कम परत कर, असे सांगितले. यानंतर पैसे माझ्या आईकडे असून, तू घरी चाल मी तुला पैसे देतो, असे मजूर सलीम याने मालकाला सांगितले. दोघेही मजूर सलीमच्या घराकडे जाण्यासाठी निघाले. काही अंतरावर मजूर सलीम याने विटभट्टीमालक शेख सलीम यांना शिवीगाळ करीत लाथाबुुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर मजूर सलीम हा रात्री अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात मजूर सलीम शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करोडी शिवारात विटभट्टीमालकाला मजुराची मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 4:05 AM