शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
2
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
3
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
4
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
5
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
6
व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
7
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
8
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
9
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
11
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
12
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
13
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
14
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
15
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
16
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
17
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
18
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
19
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
20
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."

विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमली जालनानगरी...

By admin | Published: July 05, 2017 12:27 AM

जालना : भाविकांच्या विठ्ठल जयघोषाने मंगळवारी अवघी जालनानगरी दुमदुमून गेली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आली आषाढी एकादशी.. चला करू पंढरीची वारी.. माझी विठ्ठल रूखमाई..यासारखे अभंग, भारुड, गवळणी टाळ मृदंगाच्या गजरात भाविकांच्या विठ्ठल जयघोषाने मंगळवारी अवघी जालनानगरी दुमदुमून गेली. आषाढी एकादशीनिमित्त जुना जालन्यातून काढण्यात आलेल्या आनंदीस्वामी महाराजांच्या पालखी मिरवणुकीत हजारो भाविकांनी सहभाग घेतला. रस्त्यावर ठिकठिकाणी रांगोळी काढून मंगलमय वातावरणात महिला भाविकांनी पालखीचे पारंपरिक पद्धतीने उत्साहात स्वागत केले.जालनेकरांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या आनंदी स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी जिल्हाभरातील भाविकांच्या सकाळपासूनच रांगा पाहायला मिळाल्या. मंदिर परिसरात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी स्वयंसेवक व पोलिसांची नेमणूक करण्यात आली होती. आनंदीस्वामी मंदिरात सकाळी मुख्य आरती झाल्यानंतर पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला. गळ्यात टाळ, मृदंग, डोक्यावर विठ्ठल नामाच्या टोप्या, हातात झेंडे, लेझीम, ढोल पथकाने सर्वाचे लक्ष वेधले. शनी मंदिर, कचेरी रोड, गणपती गल्ली, शास्त्री, मोहल्ला, मणियार गल्ली, भाजीमंडी मार्गे काढण्यात आलेल्या मिरवणुकीचा उशिरा आनंदस्वामी मंदिरात समारोप झाला. शहरातील विठ्ठल रुख्मिणी मंदिर, काळुंका माता मंदिर, पंचमुखी महादेव मंदिरातही भाविकांची गर्दी दिसून आली.