संजय कुलकर्णी , जालनाभारताचा पारंपरिक खेळ समजल्या जाणाऱ्या विटूदांडू या खेळास क्रीडा क्षेत्रात अधिकृत मान्यता नसली तरी या खेळाचे महत्त्व आजही कायम आहे. अखिल भारतीय विटूदांडू असोसिएशनच्या वतीने १ व २ जानेवारी २०१५ रोजी जालना येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर १७ वर्षाखालील मुला-मुलींच्या गटात हे सामने होतील. भंडारा, पालघर आणि सिंधूदुर्ग हे जिल्हे वगळता राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांतून मुला-मुलींच्या प्रत्येकी एका संघाने संयोजकांकडे नोंदणी केलेली आहे. १२ खेळाडूंचा एक संघ असणार असून त्यात ३ खेळाडू अतिरिक्त असणार आहेत. एकूण ७५० खेळाडू यात सहभागी होणार आहेत.या खेळाडंूच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. असोसिएशनचे राष्ट्रीय पंच म्हणून १९ जणांचा तर स्थानिक १३ जणांचा सहभाग राहणार आहे. अखिल भारतीय विटीदांडू असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून आ. अर्जुनराव खोतकर तर सचिव म्हणून प्रशांत नवगिरे हे काम पाहत आहेत. देशात प्रथमच होत असलेल्या या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी असोसिएशनचे अन्य पदाधिकारी विठ्ठलराव म्हस्के, विजय देशमुख, डॉ संजय होळकर, गजानन वाळके, विजय गाडेकर, डॉ. भूजंग डावकर, अमित कुलकर्णी आदी प्रयत्नशील असल्याचे संयोजकांकडून सांगण्यात आले.
देशात प्रथमच विटी दांडूचे सामने
By admin | Published: December 30, 2014 1:06 AM