शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

रणरणत्या उन्हात फिरणाऱ्या कार्यकर्त्यांनी अशी घ्यावी काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 8:01 PM

सूर्य आग ओकतोय अन् प्रचाराचा पाराही चढलाय

ठळक मुद्देडॉक्टरांचा सल्ला, जास्त पाणी प्या, बाहेरचे खाणे टाळा

औरंगाबाद : शहरात लोकसभा निवडणुकीत उमेदवारांचा प्रचार आता शिगेला पोहोचू लागला आहे आणि तसा तापमानाचा पाराही चढू लागला आहे. अशावेळी रणरणत्या उन्हात फिरणाऱ्या कार्यकर्त्यांनी पुरेशी काळजी घेतली पाहिजे. अन्यथा उष्माघाताचा फटका बसलाच समजा. त्यामुळे कार्यकर्त्यांनी योग्य काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

जिल्ह्यात २३ एप्रिल रोजी मतदान होत आहे. प्रचारासाठी काही दिवस शिल्लक राहिले आहे. अर्ज भरल्यानंतर उमेदवारांकडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. प्रचारात कार्यकर्त्यांची फौज ही सर्वांत महत्त्वाची कामगिरी पार पाडत आहेत. त्यांच्याकडून भर उन्हात एक-एक भाग पिंजून काढला जात आहे. शहरात एप्रिल महिन्याच्या प्रारंभीपासून पारा ४० अंशांवर जाऊन पोहोचला आहे. उन्हामुळे अनेकांकडून प्रचारासाठी सकाळी व सायंकाळच्या वेळेला प्राधान्य दिले जात आहे, तर अनेक जण उन्हाची कोणतीही पर्वा करताना दिसत नाही. रणरणत्या उन्हात प्रचाराच्या फेऱ्या पूर्ण करीत आहे; परंतु उन्हामुळे डिहायड्रेशनचा त्रास होतो. उष्माघाताबरोबर सौम्य उष्माघाताचाही (माईल्ड सनस्ट्रोक) धोका असतो. त्यामुळे उन्हात फिरताना पुरेशी काळजी घेतली पाहिजे. नाही तर उन्हाच्या चटक्याने आरोग्याच्या प्रश्नाला सामोरे जावे लागते. उन्हाळ्यात भरपूर पाणी पिले पाहिजे.

खबरदारी घ्यावीउन्हामुळे अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. सर्वात मोठा धोका उष्माघाताचा असतो. उष्णतेमुळे व्यक्तीला थकवा येतो. तापमान वाढल्यावर शरीरातून घाम येतो.  त्यातून शरीराचे तापमान वाढून जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे बाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी. या पाण्यात ग्लुकोज, मीठ टाकले पाहिजे. मधुमेह, हायपरटेन्शन असणाऱ्या तसेच ज्येष्ठांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. -डॉ. गजानन सुरवाडे, फिजिशियन आणि प्रभारी विभागप्रमुख, मेडिसीन विभाग, घाटी

तापमान वाढणारउन्हामध्ये आगामी दिवसात आणखी वाढ होईल. हवामान कोरडे राहील. तापमान साधारणपणे ४० अंशांच्या पुढेच राहणार आहे. शिवाय गेल्या वर्षीच्या तुलनेत तापमानाच्या सरासरीत वाढ होत आहे. त्यामुळे काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. -किरणकुमार जोहरे, भौतिकशास्त्रज्ञ, हवामान अभ्यासक

हे कराल तर वाचाल?- उन्हात फिकट रंगाचे आणि सैल कपडे परिधान केले पाहिजे. डोक्यावर टोपी, रुमाल वापरला पाहिजे. टोपीला छिद्रे असणे आवश्यक असते. - उन्हामुळे शरीरातील पाणी कमी होते. शरीराचे तापमान वाढते. त्यातून व्यक्तीला दम लागतो. उन्हात चक्कर आली, थकवा अधिक जाणवायला लागला तर विश्रांती घ्यावी.- उन्हाचा त्रास जाणवत असेल तर थंड पाणी प्यावे. अधिक त्रास होत असेल तर थंड पाण्याने आंघोळ करावी. शरीरातील मूलद्रव्य पाण्याद्वारे भरून काढावे. त्यासाठी जलसंजीवनीचे (ओआरएस) पाणी द्यावे.- उन्हामुळे व्यक्ती जर बेशुद्ध झाला असेल, तर रुग्णालयात दाखल करावे. प्रचारासाठी सकाळी अथवा सायंकाळच्या वेळेला प्राधान्य द्यावे.  बाहेरचे खाणे-पिणे कटाक्षाने टाळावे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019