या जागेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदारयादी तयार करण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. त्यानुसार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीनुसार २१ गावांत २४ मतदार केंद्रे आहेत. घायगाव गटातील गावनिहाय मतदारात नांदगावात ८१३, घायगांव १ हजार ९२१, वैजापूर ग्रामीण एकमध्ये १ हजार १३०, तिडीत १ हजार २३३, मकरमतपूरवाडीत ४७२, कनकसागजमध्ये १ हजार ३७०, टाकळीसागजमध्ये ७४०, माळीसागज १ हजार २९२, सटाणा १ हजार ९३, अगरसायगाव १ हजार १०७, जांबरगाव १ हजार ७२३, लाडगाव १ हजार ६९९, फकीराबादवाडी ७०९, नगिना पिंपळगाव १ हजार २९१, डवाळा ९५०, सुराळा १ हजार ४००, बेलगाव १ हजार ३९८, भग्गाव १ हजार १८९, वैजापूर ग्रामीण दोन ७८९, खंबाळा ९२७ व किरतपूर ४३८ अशी एकूण २३ हजार ६८४ मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पोटनिवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 4:05 AM