छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. मतदारयादीचा अंतिम पुन्हा कार्यक्रम संपला आहे. नवीन यादी प्रशासनाने अपडेट केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे १० लाख २० ते ३० वयातील मतदारांचा आमदार निवडीत मोठा वाटा असणार आहे. त्या खालोखाल ३० ते ४० वयातील मतदारांचा ७ लाख महत्त्वपूर्ण आकडा आहे.
सरासरी कोणत्या वयोगटाचे किती मतदार?वयोगट मतदार१८-१९....२ लाख२०-२९... १० लाख १२३०-३९...७ लाख ३ हजार ६४२४०-४९...५ लाख ३० हजार ३००५०-५९...३ लाख ४३ हजार६०-६९....२ लाख ४५ हजार ३६३७०-७९...१ लाख २२ हजार ९८७८०-८९...४८ हजार १०९
सर्वाधिक मतदार तिशी व चाळीशीतीलसर्वाधिक मतदार तिशीतील आहेत. दोन्ही वयोगटाचे सुमारे १७ लाख मतदार आहेत.
सर्वात कमी मतदार ८० च्या पुढीलसर्वात कमी मतदार ८० हून अधिक वयोगटातील आहेत. ४८ हजार १०९ च्या आसपास ते मतदार आहेत.
शंभरी पार केलेले ४०० मतदारशंभरी पार केलेले ४०० च्या आसपास मतदार आहेत.
अंतिम यादी प्रसिद्ध केली आहेविधानसभा निवडणुकीच्या अंतिम यादीत ५३ हजार मतदार वाढले, २० हजार मतदारांची नावे वगळली. ८५ वयापेक्षा अधिक १ हजार ९९६ मतदारांची संख्या घटली. जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील १४ हजार ४९ नवे मतदार यादीत आहेत. दिव्यांग मतदारांमध्ये देखील ३४१ ने वाढ झाली आहे.-देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी, निवडणूक विभाग