शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

'मतदारराजा, जागा हो' लोकमत न्यूज नेटवर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:17 AM

महाराष्ट्राची लोककला म्हणून ओळखल्या जाणाºया पोवाडा कलाप्रकारातून युवक कलावंतांनी शाहिरी पेहरावात 'मतदार राजा जागा हो' अशी साद घालत लोकशाहीत प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजावावा असे आवाहन केले़

नांदेड : महाराष्ट्राची लोककला म्हणून ओळखल्या जाणाºया पोवाडा कलाप्रकारातून युवक कलावंतांनी शाहिरी पेहरावात 'मतदार राजा जागा हो' अशी साद घालत लोकशाहीत प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजावावा असे आवाहन केले़मुख्य मंचावर उद्घाटन सोहळ्यानंतर पोवाडा कलाप्रकारातून छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वाच्या जीवनपटांसह स्वच्छता अभियान, मतदान जनजागृती, महिलांचे विविध प्रश्न आदी ज्वलंत विषयांवर पोवाड्याच्या माध्यमातून प्रहार केले. अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या कलावंतांनी स्वच्छता अभियानावर पोवाडा सादर केला. यामध्ये उघड्यावरील शौचालयाचे दुष्परिणाम सांगितले. त्यात सुलोचना कदम, स्नेहा कांबळे, आसना देवकते, विशाखा सोनकांबळे यांनी सहभाग घेतला. तर भाई किशनराव देशमुख महाविद्यालय चाकूरच्या कलावंतांनी शिवशाही पोवाडा सादर केला. या पोवाड्यात लक्ष्मण महालिंगे, शिवकांता बोडखे, संगीता हेमतर, अर्चना एडले, प्रतीक्षा पाटील यांनी सहभाग घेतला. परभणीच्या शिवाजी महाविद्यालयातील मनोज कुलकर्णी, श्वेता साखरे, दीपक डोईफोडे, कीर्ती कोकडवाड, कृष्णा शिनगारे या कालवंतांनी शाहिरी थाटात अंगावर शहारे आणणारा पोवाडा सादर केला़दयानंद विज्ञान महाविद्यालय लातूरच्या विद्यार्थ्यांनी शिवजन्माचा पोवाडा सादर केला़ शिवजन्माच्या वेळी शिवनेरीगडावर सुरु असलेली धामधूम याचे चित्रच उपस्थितांच्या डोळ्यासमोर आले़ यामध्ये ऋषिकेश जाधव, पूजा माने, सागर कोळी, अबोली बेडगणूर, निशाद भुत्ते, कांचन तिडोळे आदींनी सहभाग घेतला. भोकर येथील दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाच्या कलावंतांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर केला. यामध्ये मारोती आंबेटवाड, मिथुन आडे, साहेब कांबळे, आम्रपाली गायकवाड, ऐश्वर्या सर्जे, शरयू वाघमारे यांनी सहभाग घेतला.दयानंद कला महाविद्यालय लातूरच्या प्रतिज्ञा गायकवाड या विद्यार्थिनीने कोपर्डी, स्त्रियांवरील अन्याय-अत्याचार, एकतर्फी प्रेम, स्त्री सुरक्षा यासारखे ज्वलंत प्रश्न मांडले़ श्वेता गायकवाड, पल्लवी वाघमारे, योगिता चंदनशिवे, स्वप्नाली जाधव आदींनी या पोवाड्यात सहभाग घेतला़नांदेडच्या नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातील कलावंतांनी ‘मतदार राजा जागा हो’ हा पोवाडा सादर करुन लोकशाहीत एक मत देश बदलू शकतो हा संदेश दिला. यामध्ये दीपा बोंदलेवाड, प्रियंका मिरुगवाड, रेणू कानोले, सिद्धी खंडेलवाड, वैष्णवी पेटकर, पूजा देशपांडे यांनी सहभाग घेतला़ मुख्य मंचावर जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, सल्लागार समितीचे डॉ. अंबादास कदम, डॉ. शंकर विभूते, डॉ़ कमलाकर चव्हाण, डॉ. सूर्यप्रकाश जाधव आदींची उपस्थिती होती.