औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यामध्ये महाविद्यालयीन प्राध्यापक, विद्यापीठ प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक आणि विद्यापरिषदेच्या गटातील ३७ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. यात मतदानासाठी करण्यात आलेल्या नियोजनाचा फज्जा उडाला. उस्मानाबाद उपकेंद्राच्या मतपत्रिका दुपारी दोन वाजेनंतर पोहोचल्या. तर अनेक मतदान केंद्रांवर मतदानासाठीची योग्य ती काळजी घेतली नसल्याचे समोर आले. या गोंधळातही प्राध्यापकांनी विक्रमी मतदान केले आहे.विद्यापीठाच्या अधिसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी पार पडले. यात महाविद्यालयातील शिक्षक गटात १० जागा, विद्यापीठीय शिक्षकांसाठी ३, प्राचार्य- ८ (दोन बिनविरोध), प्राचार्य- ८ (दोन बिनविरोध), संस्थाचालक-४ (दोन बिनविरोध) आणि विद्यापरिषदेसाठी- ७ (एक बिनविरोध) जागांचा समावेश होता. सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली. हे मतदान सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालले. यात प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालकांनी हिरीरीने सहभागी होऊन मतदानाच्या आकडेवारीत भर घातली. पहिल्या टप्प्यातील मतदान पात्र-अपात्रेपासून सुरू असलेला गोंधळ मतदान होईपर्यंत कायम राहिला. अनेक मतदान केंद्रांतील अधिकाºयांना कोणतेही प्रशिक्षण देण्यात आलेले नव्हते. ज्या सूचना होत्या त्यातील अनेक सूचनांची अंमलबजावणी प्रत्यक्ष केंद्रांवर झालेलीच नसल्याचे स्पष्ट झाले. मतदान केंद्रांवर पाळण्यात येणारे नियम, सूचना, उमेदवारांचे प्रतिनिधी, उमेदवारांचे ओळखपत्र या सर्वांमध्ये प्रत्यक्षात सावळा गोंधळ असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी नेते, मतदार नसलेले लोक मतदान केंद्रात बसून फोन करणे, मतदार मतदानासाठी जात असताना सूचना देण्याचे काम करीत असल्याचेही दिसून आले.या सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे उपस्थित राहणे आवश्यक होते. मात्र त्यांनी अनुपस्थित राहण्यालाच पसंती दिल्याबद्दलही सर्वत्र आश्चर्य व्यक्त होतआहे.मतपत्रिका दुपारनंतर पोहोचल्याविद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्रातील मतदारांसाठीच्या मतपत्रिका दुपारी दोन वाजेनंतर पोहोचल्या. यानंतर मतदान झाले. या मतपत्रिका घेऊन जाणाºया गाडीत वाटेतच बिघाड झाल्यामुळे हा प्रकार घडल्याचे कुलसचिव व निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. साधना पांडे यांनी सांगितले. मात्र उपकेंद्रातील मतदान विद्यापीठ विकास मंचला मिळणार नसल्यामुळे जाणीवपूर्वक मतपत्रिकाच पाठविण्यास विद्यापीठ प्रशासनाने कुचराई केल्याचा आरोप उत्कर्षचे उमेदवार कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांनी केला आहे. तर कायमच उपकेंद्राकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे प्रा. संभाजी भोसले यांनी सांगितले.उमेदवारांना अडवलेविद्यापीठात मतदान संपल्यानंतर मतपेट्या सील करण्यासाठी उमेदवारांच्या सह्या घेतल्या जातात. या सह्या करण्यासाठी उत्कर्षचे उमेदवार कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड, डॉ. राम चव्हाण मतदान केंद्रात जात असताना पोलिसांनी त्यांनाच अडवले. उमेदवार असल्याचे सांगितल्यानंतरही आत सोडण्यात आले नाही. शेवटी बाचाबाची झाल्यानंतर आत सोडण्यात आले. तर याच केंद्रावर काही वेळ मतदारांना लाल शाईचा पेन मतदान करण्यासाठी दिला होता.