औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सोमवारी १९ आॅगस्ट रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान मतदान होणार आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला फोडाफोडीच्या राजकारणाला प्रचंड ऊत आला होता. दरम्यान, आज सकाळी १० वाजेपर्यत केवळ ३ टक्के मतदान झाले आहे.
शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भवानीदास ऊर्फ बाबूराव कुलकर्णी यांच्यासह एक अपक्ष या निवडणुकीच्या मैदानात आहे. २२ आॅगस्ट रोजी मेल्ट्रॉन कंपनी चिकलठाणा येथे मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. महायुतीचे बहुमत या निवडणुकीत असून सर्व मतदारांना रविवारी दुपारी ३ वा. इगतपुरी येथील विवांत रेसॉर्टमधून औरंगाबादकडे रवाना करण्यात आले. तसेच आघाडीतील काही मते फोडल्याचा दावा महायुतीकडून करण्यात येत असून, शिर्डीमध्ये काही मतदारांना रविवारी दिवसभर थांबविण्यात आले होते. ते मतदार १९ रोजी सकाळी थेट मतदान केंद्रावरच दाखल होणार असल्याचे बोलले जात आहे. पहिली आणि दुसरी पसंती देण्याबाबत युतीमध्ये रविवारी रात्री उशिरापर्यंत खल सुरू होता. तत्पूर्वी शनिवारी इगतपुरीमध्ये महायुतीच्या नेत्यांनी मतदान कसे करायचे, मतपत्रिकेवर शिक्का कुठे मारायचा, याचे प्रशिक्षण मतदारांना दिले.
गोपनीयता भंग होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क २०१३ साली झालेल्या निवडणुकीत किचैन कॅमेऱ्याचा वापर करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडे आहे. त्यामुळे यावेळी पारदर्शकतेसाठी काही कडक नियम अमलात आणले जाणार आहेत. मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेला विशेष पेन मतदारांना देण्यात येईल. तसेच विशेष डिटेक्टरच्या साहाय्याने मतदारांची तपासणी करून त्यांना मतदान केंद्रात प्रवेश दिला जाईल. गुप्त कॅमेरा, वाहनांच्या चाव्या, बटनमधील गुप्त कॅमेरा त्यांच्याकडे असल्यास तो जप्त करण्यात येईल. आजवरच्या निवडणुकीतील अनुभवामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मतदानाची गोपनीयता भंग होऊ नये, यासाठी प्रशासनाने काळजी घेतली आहे.
दोन्ही जिल्ह्यांत १७ मतदान केंद्रेऔरंगाबादमध्ये ९, तर जालन्यात ८ असे एकूण १७ मतदान केंद्र या निवडणुकीसाठी असतील. सर्वाधिक १३८ इतके मतदान औरंगाबाद तहसील कार्यालयात आहे. यावर्षी पहिल्यांदाच तहसील कार्यालय हद्दीमध्ये मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे गटबाजी, फोडाफोडीला आळा बसणार आहे.
अंदाजे पक्षीय बलाबल असे पक्ष मतदार भाजप १८९शिवसेना १४१ काँग्रेस १७०राष्ट्रवादी काँग्रेस ०८०एमआयएम ०२८रिपाइं, बसपा, अपक्ष ०४९एकूण ६५७
राजकीय समीकरणनिहाय मतदानमहायुती ३३०महाआघाडी २५०एमआयएम-अपक्ष ०७७एकूण ६५७