शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

योग्य पद्धतीने पसंतीक्रम दिला नाही तर मत ठरू शकते अवैध; जाणून घ्या पदवीधरच्या मतदानाचे नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2020 5:31 PM

केवळ मतदान केंद्रावर मतपत्रिकेसोबत पुरवण्यात आलेल्या जांभळ्या शाईच्या स्केच पेनचाच वापर मत नोंदवण्यासाठी करायचा आहे.

येत्या 1 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळाचे वरिष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठीच्या एकूण पाच जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये पदवीधरच्या 3 आणि शिक्षक मतदार संघासाठीच्या 2 जागांसाठी मतदान केले जाणार आहे. या 5 मतदारसंघातील सदस्यांची मुदत 19 जुलै 2020 रोजी संपुष्टात आली आहे. कोरोनामुळे हा निवडणूक कार्यक्रम लांबणीवर पडला होता . यामध्ये पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती या शिक्षक मतदारसंघासाठी लोकप्रतिनिधींची दि. 1 डिसेबर रोजी मतदानाव्दारे निवड करण्यात येणार आहे. पदवीधर निवडणूकीसाठी मतदान करण्यासाठी मतदार  भारतीय नागरीक आणि मतदार संघाचा रहीवासी असावा ही प्राथमिक अट आहे. मुख्य म्हणजे निवडणूकीची अधिसूचना जाहीर होण्याच्या तारखेपूर्वी तीन वर्षे आधी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला नागरीक या निवडणूकीत मतदान करण्यासाठी नाव नोंदवू शकतो. प्रत्येक निवडणूकीच्या वेळी नवीन नोंदणी असते. त्यासाठी विहीत फॉर्म 18 भरावयाचा असतो.

मतदानासाठी केवळ केंद्रावरीलच पेन वापरावा : या निवडणूकीत मतदानयंत्र (ईव्हीएमचा) वापर केला जात नाही तर मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवून मतदान केल्या जाते. मतपत्रिका मतपेटीत घडी करुन टाकल्या नंतर त्याची एकत्रित मोजणी करण्यात येते. यामध्ये निवडणूक रिंगणात जितके उमेदवार असतील तेवढ्या क्रमांकापर्यंत पसंती क्रम नोंदवता येतो. यासाठी केवळ आणि केवळ मतदान केंद्रावर मतपत्रिकेसोबत पुरवण्यात आलेल्या जांभळ्या शाईच्या स्केच पेनचाच वापर मत नोंदवण्यासाठी करायचा आहे. इतर कोणताही पेन, पेन्सिल, बॉलपेनचा वापर करता येत नाही. 

पसंतीक्रम नोंदवून करायचे आहे मतदान मतदाराने आपल्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील ' पसंतीक्रम नोंदवावा ' या रकान्यात 1 हा अंक लिहून मत नोंदवायचे आहे. यामध्ये निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या विचारात न घेता मतपत्रिकेवर जितके उमेदवार आहेत, तितके पसंतीक्रम आपण मतपत्रिकेवर नोंदवू शकता. पहिला पसंतीक्रम नोंदवल्यानंतर आपले पुढील पसंतीक्रम उर्वरीत उमेदवारांसमोरील रकान्यात 2,3,4 इत्यादी प्रमाणे आपल्या पसंतीप्रमाणे नोंदवता येतील. मात्र एका उमदेवाराच्या नावासमोरील रकान्यात एकाच पसंतीक्रमाचा अंक नोंदवावा तो पसंतीचा क्रमांक इतर कोणत्याही उमेदवारा समोर पुन्हा नोंदवू नये. आपले पसंतीक्रम हे केवळ 1,2,3 इत्यादी अशा अंकामध्येच नोंदवावेत. ते अक्षरी म्हणजे एक, दोन, तीन इत्यादी पद्धतीने नोंदवू नये. तसेच हे अंक भारतीय अंकाच्या आंतरराष्ट्रीय स्वरुपात जसे 1,2,3 इत्यादी किंवा रोम अंक स्वरुपात जसे I,II,III किंवा मराठी भाषेतील देवनागरी 1,2,3 या स्वरुपात नोंदवणे योग्य आहे.

पहिल्या पसंतीचे मत नोंदवणे अत्यावश्यक आपली मतपत्रिका वैध ठरावी याकरीता आपण पहिल्या पसंतीक्रमाचे मत नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे. अन्य पसंती क्रम नोंदवणे ऐच्छिक आहे, अनिवार्य नाही. मात्र पहिल्या पसंतीक्रमाचे मत नोंदवल्या शिवाय आपले मतदान वैध ठरत नाही. तसेच एकच पसंतीक्रम दोन किंवा अधिक उमेदवारांसमोर नोंदवण्यास तो वैध ठरत नाही. याशिवाय मतपत्रिकेवर कोठेही आपली स्वाक्षरी, आद्याक्षरे, नाव किंवा अन्य कोणताही शब्द लिहू नये. तसेच मतपत्रिकेवर अंगठ्याचा ठसा उमटवू नये. त्याचप्रमाणे मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवताना टिकमार्क “    ” किंवा “X” क्रॉसमार्क अशी खून करु नये. अशी मतपत्रिका अवैध ठरेल.

मराठवाड्यात ३ लाख ७४ हजार मतदार :मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या या निवडणूकीत विभागात 3 लाख 74 हजार 45 मतदार आहेत. विभागात एकूण 813 मतदान केंद्र आहेत.औरंगाबाद : मतदार -1 लाख 06 हजार 379, मतदान केंद्र - 206जालना : मतदार - 29 हजार 765, मतदान केंद्र - 74परभणी : मतदार - 32 हजार 681, मतदान केंद्र - 78हिंगोली : मतदार - 16 हजार 764, मतदान केंद्र 39नांदेड : मतदार - 49 हजार 285, मतदान केंद्र 123बीड : मतदार - 64 हजार 349, मतदान केंद्र- 131लातूर : मतदार - 41 हजार 190, मतदान केंद्र - 88उस्मानाबाद : मतदार - 33 हजार 632, मतदान केंद्र - 74 

( संकलन : वंदना आर.थोरात, माहिती अधिकारी, औरंगाबाद  )

टॅग्स :ElectionनिवडणूकVotingमतदानMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद