व्ही़एस़ कुलकर्णी उदगीरयंदाच्या ‘हेमलंबी’ नाम संवत्सरात पर्जन्यमान समाधानकारक होईल़ शेतकरी वर्गास पिकाबाबत समाधान मिळाले, तरी वाढत्या मजुरीमुळे व बी-बियाणांच्या महागाईमुळे लहान शेतकरी संकटात सापडतील़ पाऊसमान समाधानकारक असले, तरीही पाण्याची साठवणूक करावी लागणार आहे़ धान्य मध्यम पिकेल मात्र, संपत्ती वाढून सामान्य जनता सुखी राहील, असा अंदाज पंचागकर्त्यांनी वर्तविला आहे़चैत्र शुक्ल प्रतिपदेला (२८ मार्च २०१७ मंगळवार) शालिवाहन शक १९३९ हेमलंबी नाम संवत्सर सुरु होत आहे़ या हेमलंबी नामसंवत्सरात देशविदेशात संघर्ष वाढून युध्दे व रक्तपात होतील़ त्या दृष्टीने भारत सुसज्ज राहील़ पाऊसमान चांगले होणार असले, तरी धान्य मात्र मध्यम पिकणार आहे़ यामुळे सामान्य जनता सुखी राहणार आहे़ या वर्षात राजपद मंगळ या लढाऊ वृत्तीच्या ग्रहाकडे असल्याने सत्ताधारी वर्गात संघर्ष वाढेल़ मेघ निवास परिटाच्या घरी असून रोहिणी नक्षत्र तटावर पडले आहे़ यामुळे पर्जन्यमान समाधानकारक होऊन धनधान्याची समृध्दी होईल़ हे वर्ष लेखक, ग्रंथकार व वृत्तपत्र व्यावसायिकासाठी चांगले आहे़ संशोधन कार्यात सुधारणा घडतील़ विद्यालये, विद्यापीठे यांना हे वर्ष प्रगतीचे आहे़ त्यांच्या विकासाच्या सर्व योजना मार्गी लागतील़ पण, विद्यार्थी वर्ग काही प्रमाणात नाराज राहतील़ शैक्षणिक क्षेत्रातील असंतोषाचे वातावरण कमी होईल़ व्यापारी वर्गास हे वर्ष भरभराटीचे आहे़ देशातील आर्थिक परिस्थिती यावर्षी चांगली सावरली जाईल़बँका, पतसंस्था, पतपेढ्या यांची संख्या वाढेल़ परराष्ट्रीय व्यापार व्यवहाराच्या दृष्टीने हे वर्ष चांगले नाही़ यांत्रिक कारखानदारांना व्यवसाय क्षेत्रातील मंदीची झळ लागण्याची शक्यता आहे़ अतिमहागाईमुळे काही सार्वजनिक संस्था बंद होण्याची शक्यता आहे़
मजुरी, बियाणांच्या दराचे पुन्हा संकट !
By admin | Published: March 27, 2017 11:57 PM