लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : उद्योगांची वाट सुकर होण्यासाठी आणि औद्योगीकरणाला चालना देण्यासाठी स्टील अॅथॉरिटी आॅफ इंडिया लिमिटेडचा (सेल) डेपो औरंगाबादेत उभारण्यात येईल, अशी घोषणा झाली; परंतु स्टील डेपोची उद्योजकांना नुसतीच प्रतीक्षा करावी लागत आहे. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते गुरुवारी शहरात दाखल झाल्यावर ‘मसिआ’च्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी केंद्रीयमंत्र्यांनी स्टील डेपोविषयी सकारात्मकता दर्शविल्याचे उद्योजकांनी सांगितले.स्टील डेपो औरंगाबादेत उभारण्यात येईल, अशी घोषणा २०१५ मध्ये अनंत गिते यांनी केली; परंतु तीन वर्षांनंतरही स्टील डेपोकडे उद्योजकांना डोळे लावून बसावे लागत आहे. उद्योगांसाठी लागणारे पोलाद औरंगाबादेतच मिळावे, त्यासाठी स्टील डेपो सुरू करावा, या मागणीसाठी मराठवाडा असोसिएशन आॅफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरने (मसिआ) सातत्याने मागणी केली. मात्र, अनेक कारणांमुळे स्टील डेपो रेंगाळला आहे. अनंत गिते हे गुरुवारी (दि.७) शहरात आले असता ‘मसिआ’चे अध्यक्ष किशोर राठी, सुनील किर्दक, मनीष गुप्ता, राहुल मोगले यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी किशोर राठी यांनी विविध मागण्यांसह बºयाच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या स्टील डेपोसंदर्भात चर्चा केली. स्टील डेपो औरंगाबादेत उद्योगवाढीसाठी गरजेचे असल्याचे राठी म्हणाले.स्टील डेपोने विकासाला गतीमराठवाड्यातील उद्योगवाढीसाठी स्टील डेपो महत्त्वपूर्ण आहे. स्टील डेपोने अधिक प्रगती शक्य आहे. उद्योगांना पाठबळ मिळेल. त्याचा उपयोग नवीन गुंतवणूक आणण्यासाठी होईल. यासंदर्भात अनंत गिते यांनी सकारात्मकता दर्शवीत पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.-किशोर राठी, अध्यक्ष, मसिआ
औरंगाबादला स्टील डेपोची प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 11:51 PM
उद्योगांची वाट सुकर होण्यासाठी आणि औद्योगीकरणाला चालना देण्यासाठी स्टील अॅथॉरिटी आॅफ इंडिया लिमिटेडचा (सेल) डेपो औरंगाबादेत उभारण्यात येईल, अशी घोषणा झाली;
ठळक मुद्देउद्योजकांचे लक्ष : केंद्रीय अवजड उद्योगमंत्री गिते यांच्याशी ‘मसिआ’ची चर्चा