औरंगाबाद : पावसाळा सुरू होण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी शिल्लक असला तरी मराठवाड्यातील पाणीसाठा आत्ताच पूर्णपणे संपला आहे. काही धरणांचा अपवाद वगळता विभागातील सर्व लहान मोठी धरणे कोरडी पडली आहेत. सद्य:स्थितीत मराठवाड्यातील धरणांमध्ये सरासरी अवघा १ टक्का एवढाच उपयुक्त साठा उरला आहे. त्यामुळे विभागातील कोरड्या पडलेल्या धरणांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. कमी पावसामुळे मराठवाडा विभाग यावर्षीही दुष्काळी परिस्थितीला सामोरा जात आहे. पावसाळ्यानंतर धरणांमध्ये जेमतेम पाणी साठले होते. त्यामुळे यंदा डिसेंबर महिन्यापासूनच विभागात पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली. मे महिन्यात तर ही परिस्थिती इतिहासात कधी नव्हे इतकी भीषण बनली आहे. मराठवाड्यातील सर्व लहान मोठी धरणे आजघडीला कोरडी पडली आहेत. गोदावरी आणि मांजरा नदीवरील बंधाऱ्यांसह मराठवाड्यात एकूण लहान मोठे ८४४ सिंचन प्रकल्प आहेत. या प्रकल्पांतील उपयुक्त जलसाठ्याची एकूण क्षमता ७९८० दलघमी इतकी आहे. परंतु आजघडीला या धरणांमध्ये सरासरी अवघे एक टक्का म्हणजे ११३ दलघमी इतकेच पाणी उरले आहे. मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी केवळ निम्न दुधना या एकाच प्रकल्पात उपयुक्त साठा शिल्लक आहे. उर्वरित प्रकल्प हे मृतसाठ्यात गेले आहेत. मध्यम प्रकल्पांची अवस्थाही अशीच आहे. विभागात एकूण ७५ मध्यम प्रकल्प आहेत. यामध्ये सर्व प्रकल्पांमध्ये मिळून सध्या केवळ २५ दलघमी इतका साठा शिल्लक आहे. तर बहुसंख्य लघु प्रकल्प हे महिना दोन महिन्यांपूर्वीच कोरडे पडले आहेत. त्यामुळे या (पान २ वर)
मराठवाड्यातील धरणांना पावसाची प्रतीक्षा
By admin | Published: May 23, 2016 1:17 AM