शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
3
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
4
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
5
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
6
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
7
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
8
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
9
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
10
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
11
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
12
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
14
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
15
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
16
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
17
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
18
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
19
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

ग्राहक जागो : बासमतीच्या नावाखाली तांदळाचा ‘बनावट’ सुगंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 6:03 PM

डोक्यावर तांदळाचे पोते घेऊन ‘बासमती चावल लो’ असे म्हणत काही विक्रेते गल्लोगल्ली फिरत आहेत. मात्र, सावधान कारण, सर्वच लांब आकारातील तांदूळ  बासमती नसतो.

ठळक मुद्देतांदूळ खरेदी करताना सुगंध घेऊनच परखणी करण्यात येते. जेवढा चांगला सुगंध तेवढा तांदूळ चांगला असा गैरसमज ग्राहकांमध्ये पसरलेला आहे.

- प्रशांत तेलवाडकर औरंगाबाद : डोक्यावर तांदळाचे पोते घेऊन ‘बासमती चावल लो’ असे म्हणत काही विक्रेते गल्लोगल्ली फिरत आहेत. मात्र, सावधान कारण, सर्वच लांब आकारातील तांदूळ  बासमती नसतो. त्याचा सुगंध फसवाही असू शकतो. दुकानापेक्षा स्वस्तात मिळतो म्हणून  शहरात अनेकांनी असा तांदूळ खरेदी केला; पण तो तांदूळ पाण्यात टाकताच त्याचा सुगंध गायब झाला, असे फसल्या गेलेले ग्राहक आता मोंढ्यात व जाधववाडीत व्यापाऱ्यांकडे चौकशीसाठी येत आहेत. 

सध्या वार्षिक धान्य खरेदीचा हंगाम सुरूआहे. गहू,ज्वारी,डाळींसोबत वर्षभराचा तांदूळही आवर्जून खरेदी केला जात आहे. कारण, भात हा प्रकार प्रत्येकाच्या आहारातील अविभाज्य घटक आहे. यामुळे तांदूळ खरेदी केला जातो. तांदूळ खरेदी करताना सुगंध घेऊनच परखणी करण्यात येते. जेवढा चांगला सुगंध तेवढा तांदूळ चांगला असा गैरसमज ग्राहकांमध्ये पसरलेला आहे. तांदळामध्ये ‘बासमती’ तर नावावर विकला जातो. कारण, उच्चप्रतीचा तांदूळ म्हणून भारतीय ‘बासमती’ची जगभर ओळख आहे. सध्या ओरिजनल बासमती मोंढ्यात व जाधववाडीतील धान्य बाजारपेठेत  ७,५०० ते १,१०० रुपये प्रतिक्विंटल विकत आहे. म्हणजेच ७५ ते ११० रुपये किलोने बासमती विकत घ्यावा लागत आहे. मात्र, कोणी तुम्हाला ५० ते ६० रुपये किलोने बासमती तांदूळ दिला, तर आश्चर्य वाटेल ना... अहो, शहरातील गल्लोगल्लीत सध्या काही विक्रेते तांदूळ विकत फिरत आहेत. 

डोक्यावर तांदळाचे पोते घेतलेले हे विक्रेते चक्क किराणा दुकानदारापेक्षा कमी भावात बासमती विकत आहेत आणि सुगंधही चांगला असल्यामुळे अनेकांनी हा तांदूळ खरेदी केला. कारण, स्वस्तात बासमती खाण्यास मिळाल्यावर कोणाला नाही आवडणार. मात्र, या लोकांनी भात करण्यासाठी जेव्हा तो तांदूळ पाण्यात भिजविला तेव्हा त्यांना आपण फसवले गेलो आहोत हे लक्षात आले आणि त्यांचे डोळे खडकन् उघडले. कारण, पाण्यात तो तांदूळ भिजताच त्याचा सुगंध गायब झाला. सिडको एन-६ परिसरातील वसुधा नावाच्या महिलेने हा तांदूळ जेव्हा जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीतील एका होलसेल तांदूळ विक्रेत्याकडे आणून दाखविला. तर त्या व्यापाऱ्याने हा तांदूळ बासमती नसून परमल तांदूळ असल्याचे सांगितले व त्याची किंमत २६०० ते ३ हजार रुपये प्रतिक्विंटल म्हणजे २६ ते ३० रुपये किलोने विकत असल्याचे सांगितले. स्वस्ताच्या मोहापायी दुप्पट पैसे देऊन फसविल्या गेलेली वसुधा ही एक ग्राहक नव्हे, तर असे शहरातील विविध भागातील अनेक ग्राहक मागील तीन आठवड्यांत फसविल्या गेले आहेत. कोणी पोलिसांत तक्रार देत नसल्यामुळे फसवेगिरी करणाऱ्यांचे फावत आहे. 

स्वस्तातील तांदळाला बासमतीचा सुगंधपरप्रांतातून काही विक्रेत्यांची टोळी आली आहे. येथील हॉटेलमध्ये त्यांचे वास्तव्य आहे. हे फसवेगिरी करणारे विक्रेते होलसेल विक्रेत्यांकडून २६०० ते ३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा तांदूळ खरेदी करतात. हॉटेलमध्ये रुमवर गेल्यावर त्या तांदळास बासमती सुगंधी तेल, पावडर चोळतात. यामुळे त्या तांदळाला बासमतीचा सुगंध येतो. हे लोक रिक्षा भाड्याने घेऊन दिवसभर शहरातील विविध भागात फिरून बासमतीच्या नावाखाली हलक्या प्रतीचा तांदूळ माथी मारतात. ग्राहकांची फसवणूकच आहे. 

 असली, नकली बासमती कसा ओळखालतांदळाचे होलसेल विक्रेते जगदीश भंडारी यांनी असली व नकली बासमतीतील फरक सांगितला आहे. स्वस्ताच्या मोहात फेरीवाल्याकडून तांदूळ खरेदी करूनये. आपल्या विश्वासातील किराणा दुकानदाराकडून तांदूळ खरेदी करावा, कारण, तांदूळ खराब निघाला तर तो बदलून देऊ शकतो. फेरीवाल्यास कुठे शोधत बसणार, असा सल्लाही त्यांनी दिला. 

असली बासमती नकली बासमती १)बासमती तांदूळ पाण्यात धुतला तरी सुगंध जात नाही.       १) नकली बासमती पाण्यात धुतला तर सुगंध उडून जातो. २) बासमतीचा सुगंध दीर्घकाळ टिकून राहतो                        २) असली बासमतीपेक्षा अधिक सुगंध येतो; पण काही  दिवसांनी सुगंधहीन बनतो. ३) बासमती तांदूळ लांब असतो                                             ३) आता बाजारात बिनासुगंधाच्या लांब तांदळाच्या अनेक व्हरायटी आल्या आहेत. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रMarketबाजारAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस