औरंगाबाद : भिंत अंगावर कोसळून एका तरुणाचा मृत्यू, तर तीन जण जखमी झाल्याची घटना इंदिरानगर येथे मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. इरफान पठाण (२०), असे मृत तरुणाचे नाव असून सय्यद मोईम सय्यद असीम (२५), अब्दुल चाँदखान (२८), शेख कलीम शेख रौफ (३०), अशी जखमींची नावे आहेत. त्यांना एमजीएमममध्ये दाखल करण्यात आले आहे. सिडको अग्निशामक दल व जवाहरनगर पोलीस ठाण्यातून ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरानगर येथील नूर मशिदीजवळ बांधकाम चालू असताना रात्री ९ वाजता या चार जणांवर ही भिंत कोसळली. ते इथे काय करीत होते? भिंत नेमकी कशामुळे कोसळली याची माहिती पोलिसांनी मध्यरात्री एक वाजेपर्यंत मिळाली नव्हती. घटनेनंतर या चौघांनाही एमजीएम रूग्णालयामध्ये भरती करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी इरफानला तपासून मृत घोषित केले. त्याचा मृतदेह रात्री उशिरा शवविच्छेदनासाठी घाटीमध्ये नेण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. घटनेसंदर्भात जखमींकडून बुधवारी सकाळी पूर्ण जबाब घेतला जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले. घटनेची माहिती कळताच रात्री सव्वा दहा वाजता सिडको अग्निशामक दलाचे प्रमुख एस. एम. शकील यांच्यासह एस. एस. कुलकर्णी, वैभव बाकडे, वाहनचालक अब्दूल हमीद यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
औरंगाबादेत भिंत कोसळून एक ठार; तीन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 1:02 AM
भिंत अंगावर कोसळून एका तरुणाचा मृत्यू, तर तीन जण जखमी झाल्याची घटना इंदिरानगर येथे मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. इरफान पठाण (२०), असे मृत तरुणाचे नाव असून सय्यद मोईम सय्यद असीम (२५), अब्दुल चाँदखान (२८), शेख कलीम शेख रौफ (३०), अशी जखमींची नावे आहेत.
ठळक मुद्देजखमींवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू