शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

भिंतीला भेगा पडल्या, छत गळू लागले; शाळा भरवायची कशी? विद्यार्थी शिकणार कधी?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 8:22 PM

प्रशासनाचे दुर्लक्ष विद्यार्थ्यांच्या मुळावर

- दादासाहेब गलांडेपैठण : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या १२ केंद्रांमधील १२४ वर्गखोल्यांमधील काही खोल्यांच्या भिंतीला तडे गेले आहेत, तर काही ठिकाणी छत टपकत आहे. कोंदट वातावरणामुळे जीव कासावीस होत असताना या धोकादायक खोल्यांमध्ये ज्ञानार्जन करण्याची वेळ चिमुकल्यांवर आली आहे.

पैठण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २६४ शाळा असून, या शाळांमधील ३० वर्गखोल्यांमध्ये २९ हजार ९०५ विद्यार्थी शिक्षण घेतात. २०२२-२३ मध्ये तालुक्यातील निजामकालीन १३ वर्गखोल्यांची दुरुस्ती करण्यात आली होती. उर्वरितपैकी १२४ वर्गखोल्यांची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. यातील १८ वर्गखोल्यांची भिंत तर कधीही कोसळू शकते. त्यामुळे विद्यार्थी जीव मुठीत घेऊन या वर्गखोल्यांमध्ये बसत आहेत. या वर्गखोल्यांच्या पत्र्याच्या छताला गळती झाली असून, अनेक ठिकाणी वर्गखोल्यांच्या भिंतींना तडे गेले आहेत. फरशा उखडल्या आहेत. या शाळांच्या परिसरातील स्वच्छतागृहांची स्थितीही दयनीय झाली आहे. काही ठिकाणच्या वर्गखोल्यांच्या खिडक्या, दरवाजे खिळखिळे झाले असून, ते कुजले आहेत. पावसाळ्यात या वर्गखोल्या गळत असल्याने सतत कोमट वास येतो. अशाच स्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची वेळ आली आहे.

ग्रामपंचायत कार्यालयात भरतात वर्गपैठण तालुक्यातील पिंपळवाडी केंद्रांतर्गत पाचलगाव येथील वर्गखोल्या धोकादायक झाल्यामुळे या शाळेत वर्ग भरवणे गेल्या १५ दिवसांपासून बंद करण्यात आले आहे. आता येथील पहिली ते चौथीचे वर्ग ग्रामपंचायत कार्यालयात भरत आहेत. तशी माहिती केंद्रप्रमुख मंगल मदने यांनी दिली. असे असताना येथील शाळेच्या दुरुस्तीसाठी अद्याप शिक्षण विभागाने पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे शिक्षण विभाग शाळांबाबत किती गंभीर आहे, हे दिसून येते, अशी खोचक टीका येथील ग्रामस्थ करीत आहेत.

वर्गखोल्या दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडेतालुक्यातील २६४ पैकी १८ वर्गखोल्या वर्ग भरविण्यालायक नसल्याने त्या पाडण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविला असून, १२४ वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव २३ जुलै २०२४ रोजी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर या वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल, अशी माहिती गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड व जि. प.चे कनिष्ठ अभियंता आनंद मैराळ यांनी दिली. नवीन १५२ वर्गखोल्यांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

या केंद्रातील वर्गखोल्यांची होणार दुरुस्तीआडुळ १८, आपेगाव १०, कडेठाण ५, ढोरकीन ५, निलजगाव १०, पाचोड १३, पिंपळवाडी (पि) १२, पैठण ५, बालानगर २२, लोहगाव १५, विहामांडवा २, पानराजनगाव १.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रAurangabadऔरंगाबाद