छत्रपती संभाजीनगर : आधी भाज्या महागल्या. नंतर गहू, डाळी आणि आता तांदळाचे भावही वधारले आहेत. मागील आठ दिवसांत किलोमागे २ ते ८ रुपयांनी तांदूळ महागल्याने भात खाणाऱ्या खवय्यांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
का महागला तांदूळ ?तांदळाचे उन्हाळी पीक कमी राहिले. परिणामी, मागणी व पुरवठ्यात तफावत निर्माण झाल्याने मागील आठवड्यात तांदळाचे भाव वाढत राहिले. बासमती तांदळाचे भाव स्थिर असले तरी अन्य कोलम, सोना मसुरी, काली मूँछ, आंबेमोहर या तांदळाचे भाव वाढले आहेत.
दररोज १५० ते २०० टन तांदळाचा खपजिल्ह्यात दररोज १५० ते २०० टन तांदळाची विक्री होते. यावरून भात खाणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात महाराष्ट्रासह पंजाब, हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश इ. राज्यांतून तांदळाची आवक होते.
काय आहेत तांदळाचे दर? (प्रति किलो)प्रकार १५ मे २५ मेकोलम ६० ते ६५ रु---- ६६ ते ७० रु.काली मूँछ ७० ते ७२ रु---- ७६ ते ८० रु.आंबेमोहर ६० ते ६५ रु---- ६५ ते ६८ रु.सोना मसुरी ४८ते ५० रु---- ५० ते ५२ रु.बासमती ६० ते १२० रु---- ६० ते १२० रु.साधा तांदूळ ४० ते ४५ रु---- ४० ते ४५ रु.
शहरवासीयांना आवडतात कोलम, काली मूँछशहरामध्ये कोलम, काली मूँछ, सोना मसुरी, आंबेमोहर या तांदळाची जास्त विक्री होते. आता वार्षिक धान्य खरेदीत दोन प्रकारचे तांदूळ खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. कोलम, काली मूँछ किंवा आंबेमोहरसोबत सणासुदीसाठी बासमतीही खरेदी केला जात आहे.- श्रीकांत खटोड, व्यापारी