शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

सावधान, औरंगाबादच्या हवेची गुणवत्ता धोक्याकडे! सिमेंटचे जंगल, औद्योगिकरण, प्रदूषण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2022 6:10 PM

शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स मंगळवारी १०१ होता. त्यामुळे आपण हळूहळू धोक्याच्या पातळीकडे सरकतोय

औरंगाबाद : शहरात वाढणारे सिमेंटचे जंगल, औद्योगिकीकरण, वाहनांमधून पडणाऱ्या विषारी धुरामुळे शहराच्या हवेची गुणवत्ता आता धोक्याच्या पातळीकडे हळूहळू वाढू लागली आहे. यासंदर्भात वेळीच उपाययोजना न केल्यास औरंगाबादची हवा दिल्लीसारखी होण्यास फार वेळ लागणार नाही.

शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स- १०१, इंडेक्स १०० पेक्षा कमी हवाशहराचा एअर क्वालिटी इंडेक्स ० ते १०० पर्यंत असेल तर हवा शुद्ध आहे, असे म्हणायला हरकत नाही. शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स मंगळवारी १०१ होता. त्यामुळे आपण हळूहळू धोक्याच्या पातळीकडे सरकतोय, हे विशेष.

कारणे काय?बेसुमार वृक्षांची कत्तल करून तेथे टोलेजंग इमारती बांधण्याचा सपाटा सुरू आहे. शहराच्या आसपासची शेती आता प्लॉटिंगमध्ये बदलत आहे. नवीन वृक्षांची लागवड फार कमी होते. औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे. वाहनांची संख्याही अफाट झाली. पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस ढासळत चालला आहे.

घराबाहेर पडताना मास्क लावाकोरोनामुळे आपण मास्क वापरतच आहोत. नेहमीसाठीही आपण मास्कचा वापर केला तर काही बिघडत नाही. शहराची हवा अजून चांगली आहे. एवढी वाईट अवस्था शहराची नाही. घराबाहेर पडले तर हवेमुळे विविध आजार होतील, अशी परिस्थिती सुदैवाने नाही. मास्क वापरणे हाच पर्याय आहे.- डॉ. अभय जैन, वैद्यकीय तज्ज्ञ.

हवेची गुणवत्ता कशी सुधारणार?झाडे लावणे हा सर्वात उत्तम पर्याय आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरासमोर किमान एक तरी झाड लावले तर शहरातील हवेची गुणवत्ता कधीच खराब होणार नाही.- रवी चौधरी, पर्यावरणप्रेमी

औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने काम करायला हवे. वीटभट्ट्या, प्लास्टिक जाळणे, टायर जाळणे आदी प्रकार थांबवून सार्वजनिक वाहनांचा जास्त वापर करावा.- जे. एम. भडके, पर्यावरणप्रेमी

प्रशासन काय करतंय?महापालिका आणि स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी भविष्यात काय करावे लागेल, यासाठी डीपीआर तयार करण्यात येतोय. मनपाकडून दरवर्षी किमान २५ हजारांपेक्षा जास्त झाडे लावण्यात येतात. ती जगावेत, म्हणून कसोशीने प्रयत्न होतात.- विजय पाटील, उद्यान अधीक्षक, मनपा.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादpollutionप्रदूषणenvironmentपर्यावरणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका