लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात जमा होणाºया कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. आता प्रत्यक्षात प्रक्रिया केंद्र उभारण्याचा श्रीगणेशा करण्याची वेळ आली तरी कुठेच काम सुरू झालेले नाही. हर्सूल, पडेगाव येथे शेड उभारणीलाच कडाडून विरोध सुरू आहे. येथे महापालिकेचे अधिकारी, कंत्राटदार पायही ठेवू शकत नाहीत, अशी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. चिकलठाण्यात शेड कुठे उभा करायचा हेच मनपा प्रशासनाला माहीत नाही. कारण जमिनीची मोजणीच केलेली नाही. मशीन आल्या, शेड उभारणी युद्धपातळीवर सुरू आहे. चार दिवसांत कचºयावर प्रक्रिया सुरू होणार, अशी भंपकबाजी अधिकारी व पदाधिकाºयांकडून सुरू आहे.१६ फेब्रुवारीपासून शहरात कचराकोंडी निर्माण झाली आहे. येणाºया फेब्रुवारी महिन्यात कचराकोंडीला एक वर्ष पूर्ण होईल. या एक वर्षात महापालिकेला कचºयाचा प्रश्न १00 टक्के सोडविता येणार नाही, अशी परिस्थिती आहे. येणाºया ३ ते ४ महिन्यांत कचºयावर प्रक्रिया करणारी संपूर्ण यंत्रणा उभी राहण्याची शक्यता कमीच आहे. मनपाकडून अद्याप ठोस असे कोणतेच काम सुरू झालेले नाही.चिकलठाण्यात जागेची मोजणीच नाही४चिकलठाण्यात महापालिका दुग्धनगरीच्या आरक्षित जागेवर कचरा प्रक्रिया केंद्र उभारणार आहे. दुग्धनगरीची जागा कुठपर्यंत आहे, हे मनपालाच माहीत नाही. आठ दिवसांपासून तालुका भूमी अभिलेख विभागाकडून जमीन मोजणी करणार अशा फक्त घोषणा सुरू आहेत. कृती मात्र, शून्य आहे. सध्या तात्पुरत्या शेडचे काम सुरू असल्याचा दावा करण्यात येतो, तोसुद्धा फोल आहे. बेलिंग, श्रेडिंग मशीन आल्या आहेत. चार दिवसांत प्रक्रिया सुरू होणार असल्याचा दावा पदाधिकाºयांकडून करण्यात येतो.हर्सूलची वस्तुस्थिती अशी४हर्सूल सावंगी तलावाजवळ अगोदर महापालिकेने तात्पुरत्या स्वरुपात कचरा टाकायचे म्हणून पाय पसरले. मागील पाच महिन्यांपासून येथे शहरातील ओला व सुका मिक्स कचरा नेऊन टाकण्यात येत आहे. ज्याठिकाणी हा कचरा टाकण्यात येतोय त्या पत्र्याच्या शेडची क्षमताही संपली. कचरा ओसंडून शेडबाहेर येत आहे. येथे दीडशे मेट्रिक टन क्षमता असलेले कचरा प्रक्रिया केंद्र उभे करायचे आहे. त्यासाठी शेड उभारणीसाठी मजूर गेल्यावर त्यांना अक्षरश: मारहाण करून पाठवून देण्यात आले.पडेगावला चलेजावचा नारा४पडेगाव येथील कत्तलखान्याच्या जागेवर मनपा १५० मेट्रिक टन क्षमतेचे कचरा प्रक्रिया केंद्र उभारणार आहे. येथे काही नागरिकांनी मनपाने आम्हाला भाडेतत्त्वावर जागा दिलीअसल्याचा दावा ठोकला आहे. यासंदर्भातील वाद न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. या जागेवरसंबंधित नागरिक, परिसरातील नागरिक मनपाला पाय ठेवू देत नाहीत. मनपा कर्मचारी, कंत्राटदारांचे मजूर दिल्यास चलेजावचा नारा देण्यात येतो. महापालिका प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरत आहे.
कचऱ्यावर प्रक्रिया; श्रीगणेशा होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:47 AM
शहरात जमा होणाºया कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. आता प्रत्यक्षात प्रक्रिया केंद्र उभारण्याचा श्रीगणेशा करण्याची वेळ आली तरी कुठेच काम सुरू झालेले नाही. हर्सूल, पडेगाव येथे शेड उभारणीलाच कडाडून विरोध सुरू आहे. येथे महापालिकेचे अधिकारी, कंत्राटदार पायही ठेवू शकत नाहीत, अशी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देकाम ठप्प : औरंगाबाद मनपा प्रशासनाची इच्छाशक्तीच नाही