नाथा भावराव लोंढे (३९, रा. चंदन अपार्टमेंट, राणानगर) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, नाथा हे जुना मोंढ्यातील राणा शेठ यांच्या चंदन अपार्टमेंट येथे वॉचमन होते. १३ जून रोजी रात्री नाथा हे बाहेरून घरी गेले, तेव्हा भाजीवरून त्यांची पत्नीसोबत कुरबुर झाली. यानंतर ते समोरच्या खोलीत झोपतो असे म्हणून गेले. शेजारच्या खोलीत त्यांची पत्नी, मुलगी आणि मुलगा तर गॅलरीत त्यांची सासू झोपली होती. रात्री १.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या सासूला जाग आली तेव्हा नाथा यांनी छताच्या पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतल्याचे दिसले. त्यांनी आरडाओरड केल्यावर नातेवाईक जमा झाले. त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी पहाटे ४:३० वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याविषयी पुंडलिकनगर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हवालदार शेख तपास करीत आहेत.
राणानगरात वॉचमनची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:02 AM