हिमायतनगर : शहरात ७० ते ८० बोअर असून ५० टक्के बंद पडले आहेत. शहराला बोअरबरोबर चार टँकरद्वारे पाणीपुरवठा मुरली बंधाऱ्यावरुन २५ फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती नगराध्यक्षा अ. असीफ अ. हमीद नगरसेवक प्रभाकरराव मुधोळकर यांनी दिली.शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीपातळी खोल गेल्याने नगरपंचायत व वैयक्तिक मालकीचे बोअर बंद पडत आहेत. शहरासाठी व टँकरची मागणी केली होती. ४ टँकरद्वारे सध्या अनेक वॉर्डात पाणीपुरवठा होणार आहे.मुरली बंधाऱ्यासाठी ३० कोटींची पाणीपुरवठा मंजूर झाली असून त्याचा सर्वे झाल्याची माहिती नगरपंचायतीचे लिपिक महेबुबभाई यांनी दिली. शहराला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी मुरली बंधाऱ्याला नगराध्यक्ष अखिल अ. हमीद , आश्रफभाई प्रभाकरराव मुधोळकर , अनिल पाटील, फिरोज खॉन, सरदार खॉन पठाण, राहुल लोणे आदींनी २३ जुलै रोजी भेट दिली. तेथे मोटारीद्वारे किंवा इंजिनद्वारे टँकरमध्ये पाणी भरले जाणार असून शहराची तहान भागविली जाणार आहे. मारोती हेंद्रे, महेबुबभाई, विठ्ठल शिंदे हे नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते. शहराला पुढील मार्चपर्यंत आता सुरू होणारे ४ व ५ ट्रॅक्टरद्वारे असे व टँकर द्वारे पाणी पुरवठा केला जाईल. त्यासाठी प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करु असे नगराध्यक्ष अ. अखिल अ. हमीद यांनी सांगितले. (वार्ताहर)
हिमायतनगरसाठी ४ टँकरद्वारे पाणी
By admin | Published: February 24, 2016 11:47 PM