परिसरातील नागरिकांनी मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय तसेच पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, पाणी पुरवठा नियमित आणि योग्य प्रमाणात करावा, अशी मागणी केली आहे.
परिसरातील नागरिक म्हणाले की, कॅनॉट परिसरात ८ दिवसांतून एकदा पाणी येते. ४५ मिनिटांसाठी पाणी येते, पण ते ही अत्यंत कमी दाबाने येत असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे वारंवार टँकर मागवावे लागते. पाणीपट्टी भरूनही टँकरचा हा अधिकचा आर्थिक भुर्दंड अनेकांना न परवडणारा आहे. याशिवाय पाण्याच्या वेळा नियमित नसल्याने नोकरदार व्यक्तींना अनेकदा पाणी मिळतच नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत, असे स्वाती स्मार्त, अनघा केसकर, अपर्णा कुलकर्णी, पुष्पा तौर, बबिता वानखेडे, मंगल देशमुख, अनिता पिंपळकर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.