लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पारळा येथील मन्याड प्रकल्पात ५ ते ६ तरुणांनी दुपारी ४ वाजता जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, जीवरक्षक दलाच्या कर्मचाºयांनी बोटीच्या मदतीने सदर तरुणांना त्वरित पाण्याबाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. जिल्हाधिका-यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले. यानंतर सायंकाळी ५ वाजता आंदोलन मागे घेण्यात आले.मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते अजय साळुंके, चंद्रशेखर साळुंके, संतोष निकम, सोमनाथ मोरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मन्याड प्रकल्पावर दाखल झाले. यावेळी प्रकल्पाच्या काठावर उभे राहून कार्यक्रर्त्यांनी जलसमाधी आंदोलनला सुरुवात केली. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार, तहसीलदार सुमन मोरे यांनी आंदोलक कार्यक्रर्त्यांशी चर्चा करून मराठा समाजाच्या भावना सरकारपर्यंत नेऊ, असे आश्वासन देत ज्या काही मागण्या आहेत त्यांचे निवेदन देण्याची मागणी केली.मात्र, जोपर्यंत जिल्हाधिकारी उदय चौधरी येत नाहीत, तोपर्यंत आंदोलन थांबविणार नाही, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला. तसेच दुपारी ४ वाजेपर्यंत वाट पाहू नसता जे घडेल त्याला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला. यानंतर जिल्हाधिकाºयांसोबत व्हिडिओ कॉलिंगद्वारे बोलण्याची व्यवस्था अधिकाºयांनी केली. मात्र, आंदोलकांनी फोनवर बोलण्यास नकार दिला. यावेळी आंदोलकांनी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करीत चिकटगाव येथील देवीदास निकम यांच्यासह पाच ते सहा तरुणांनी प्रकल्पात उड्या मारल्या. मात्र, येथे तैनात करण्यात आलेल्या जीवरक्षक दलाच्या कर्मचाºयांनी बोटीच्या मदतीने सदर तरुणांना त्वरित पाण्याबाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. यावेळी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान, आंदोलक आक्रमक भूमिका घेत असल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर दुपारी ४.३० वाजता जिल्हाधिकारी उदय चौधरी मन्याड प्रकल्पावर पोहोचले. त्यांनी आंदोलक कार्यकर्त्यांची भेट घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावे, त्याकरिता प्रशासन पाठपुरावा करील, असे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन सायंकाळी ५ वाजता मागे घेण्यात आले.प्रशासनाकडून चोख बंदोबस्तप्रशासनाने सुरक्षा व खबरदारीचा उपाय म्हणून सकाळीच प्रकल्पाच्या चोहोबाजूंनी जीवरक्षक दल मन्याड प्रकल्पावर तैनात केले होते. उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, तहसीलदार सुमन मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार, वैजापूरचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, वीरगावचे पोलीस उपनिरीक्षक अतुल येरमे, शिऊरचे उपनिरीक्षक तांदळे आदींसह पोलीस व महसूलचे अधिकारी आंदोलनावर लक्ष ठेवून होते. यावेळी कार्यकर्त्यांसह हजारो नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
औरंगाबाद जिल्ह्यात तरुणांचा जलसमाधीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 12:38 AM
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पारळा येथील मन्याड प्रकल्पात ५ ते ६ तरुणांनी दुपारी ४ वाजता जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, जीवरक्षक दलाच्या कर्मचाºयांनी बोटीच्या मदतीने सदर तरुणांना त्वरित पाण्याबाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. जिल्हाधिका-यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले. यानंतर सायंकाळी ५ वाजता आंदोलन मागे घेण्यात आले.
ठळक मुद्देमराठा आरक्षणाची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारले निवेदन