छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी धरणाचा मोठा आधार असतानाही कृत्रिमरीत्या पाण्याचा सदैव तुटवडा जाणवणारे एकमेव शहर म्हणजे छत्रपती संभाजीनगर होय. ७ ते ८ दिवसानंतर येथे नळाला पाणी येते. तर आसपासच्या पंचक्रोशीत तर नळ ही पोहोचले नाही. तिथे बोअरच्या पाण्यावरच रहिवासी तहान भागवत आहे. शहर व आसपासच्या परिसरात दरवर्षी ४ ते ५ हजार बोअर घेतले जातात. काही भागात भूगर्भातील जलस्तर घसरल्याने ३५० फूटापर्यंत खाली बोअर घेतले जात आहेत.
शहरात किती बोअरवेल व्यावसायिकबोअरवेल व्यवसाय असंघटित आहे. तरी शहरात गारखेडा, पडेगाव, वाळूज, मयूर पार्क या भागात बोअरवेल व्यावसायिकांचे एकूण ८० कार्यालये आहेत. आजघडीला २०० च्या जवळपास बोअरवेल मशीन आहेत.
कोणत्या महिन्यात बोअर घेतले जाताततसे वर्षभर शहरात बोअर घेतले जातात. कुठे घरासमोर, कुठे प्लॉटिंगवर, कुठे व्यावसायिक ठिकाणी बोअर घेतले जात असतात. ‘एप्रिल व मे ’ या दोन महिन्यात बोअर घेण्याचे प्रमाण अधिक असते. वर्षभरात ४ ते ५ हजार बोअर घेतले जातात. त्यातील २ हजार ते अडीच हजार बोअर या दोन महिन्यात घेतात. कारण, कडक उन्हाळा असतो व भूगर्भातील पाणीपातळी खोल गेलेले असते. या काळात पाणी लागले की, ती बोअर वर्षभर पाणी देते असे म्हटले जाते.
कोणत्या भागात ३०० फूट खोल घेतात बोअरशहरातील बीड बायपासवरील कमन नयन बजाज हॉस्पिटल मागील भाग ते सुधाकरनगर पर्यंतच्या परिसरात ३५० ते ४०० फुटापर्यंत भूगर्भातील पाणी पातळी खोल गेली आहे. तसेच करमाड, शेंद्रा, शेंद्राबन, बाळापूर याभागात ३०० ते ३५० फूट खालीपर्यंत बोअर घ्यावे लागते. अन्य भागात २०० ते २५० फुटापर्यंत पाणी लागते. मात्र, २०० फुटापर्यंत बोअर घेण्याचे शासकीय नियम आहे.
किती आकारात असतो बोअरचा पाइपव्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार ४.५० इंची बोअरसाठी ५ इंची पाइप तर ६.५० इंची बोअरसाठी ७ इंची पाइपचा वापर केला जातो. जिथे प्लॉट आहे तिथे ६.५० इंची बोअर घेतले जाते. अन्य ठिकाणी ४.५० इंची बोअर घेतले जाते.
बोअर घेण्याचे सध्याचे दरबोअर घेेण्याचे दर शहरात असे एक नाही. असंघटित क्षेत्र असल्याने बोअरवेल व्यावसायिकाने वेगवेगळे दर आहेत. साधारणतः ४८ रुपये ते ७० रुपयांपर्यंत प्रती फूट असे दर आकारले जाते. एक बोअर घेण्यासाठी १५ हजार ते ६० हजार रुपये दरम्यान ‘दर’ आकारले जातात.- नागेश रेड्डी, बोअरवेल व्यावसायिक