औरंगाबाद : शहरावर दुष्काळाची सावली गडद होत असून, पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. शहरातील अनेक वसाहतींत पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. उन्हाळ्याच्या तोंडावरच हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट दूर करण्यासाठी टँकरसाठी शासनाकडून निधी मिळविण्यासाठी मनपा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना प्रस्ताव देणार आहेत.
महापौर नंदकुमार घोडेले यांच्या उपस्थितीत बुधवारी विभागप्रमुखांची बैठक घेण्यात आली. यावेळी उपायुक्त डी. पी. कुलकर्णी, वसंत निकम, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, अफसर सिद्दीकी, एम. बी. काझी, उपअभियंता के. एम. फालक आदींसह मनपा अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. शहरातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. परिणामी पाण्यासाठी नागरिकांची निवेदने येण्याचे प्रमाण वाढले आहे. मनपासमोर आंदोलनेदेखील होत आहेत. शहरात शंभरावर वसाहतीत जलवाहिनीचे जाळे नाहीत, अशा भागांमध्ये उन्हाळ्यात पाणीपुरवठा क रण्याचे आव्हान महापालिकेसमोर उभे राहिले आहे.
दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी गावागावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जातो. याचप्रमाणे शहरातही टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर सुरू करावे अथवा निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाणार आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्यामार्फत हा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला जाणार आहे. टँकरच्या माध्यमातून शहराला ३ ते ४ एमएलडी पाणी मिळविण्यासाठी मनपाकडून प्रयत्न केला जात आहे.
पाणीपुरवठ्यावरून महापौर नंदकु मार घोडेले यांना घेरण्याचा प्रयत्न २२ फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत झाला होता. सभेच्या सुरु वातीलाच पाणीपुरवठ्यावर गदारोळ झाला. पाणी द्या नसता पाणीपट्टी घेऊ नक ा, अशा शब्दांत नगरसेवक ांनी प्रशासनाला खडसावले. सात-आठ वर्षांपासून पाणीपट्टी मिळणाऱ्या भागावर प्रशासनाने ‘नो नेटवर्क’चा शिक्का मारू न जलवाहिन्यांची क ामे क ा रोखली, असा प्रश्न नगरसेवकांनी केला होता. त्यानंतर महापालिकेने टँकरसाठी प्रस्ताव पाठविण्याची तयारी केली आहे.
आपत्कालीन पंप सुरू करणारजायकवाडीतील पाण्याची परिस्थितीही गंभीर झाली आहे. सध्या पाणी उपलब्ध असले तरीही याठिकाणी आपत्कालीन पंप सुरूकरावे लागणार आहे, त्याची महापालिकेकडून तयारी केली जात आहे. त्यासाठी लवकरच १९ लाखांची निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
टँकरवर राहणार मदारशहरात सध्या ९४ टँकर सुरूआहेत. प्रत्येक टँकर ७ ते ८ फेऱ्या मारतात. अशाप्रकारे टँकरच्या सहाशेवर फेऱ्या होतात. शहरात उन्हाळ्यात आणखी किमान १०० टँकर लागणार आहे. उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांची टँकरवरच मदार राहणार आहे.
‘एमआयडीसी’कडून हवे ४ एमएलडी पाणी‘एमआयडीसी’च्या जलवाहिनीद्वारे मनपाला पाणी घ्यावे लागणार आहे. त्यासाठीदेखील मनपा उद्योगमंत्र्यांना प्रस्ताव देणार आहे. निशांत पार्क, पीडब्ल्यूडी कॉलनी, शिवकृपा कॉलनी, राजगुरूनगरसह बीड बायपास परिसरातील वसाहतींसाठी ४ एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी ‘एमआयडीसी’ला पत्र देण्यात आल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.