छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पावसाने दडी मारल्यामुळे ७६ शहरांवर पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट आले आहे. विभागीय प्रशासनाने याबाबत चाचपणी केली असून, शासनाला याबाबतची माहिती अहवालानुसार कळविली आहे. बहुतांश शहरांना एक ते सहा महिने पुरेल एवढाच जलसाठा सध्या प्रकल्पात आहे. उर्वरित पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्यास मराठवाड्यातील तालुक्यातून स्थलांतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ५ तालुक्यांना ऑगस्ट २०२३ अखेरपर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.
६ तालुक्यांना सप्टेंबर अखेरपर्यंत, ९ तालुक्यांना ऑक्टोबरपर्यंत पाणी पुरेल एवढा साठा लगतच्या प्रकल्पांमध्ये आहे. ५ तालुक्यांना नोव्हेंबर २०२३ अखेरपर्यंत, ३६ तालुक्यांना डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत पिण्याचे पाणी देणे शक्य होईल. उर्वरित १५ पैकी १० तालुक्यांना जानेवारी २०२४, मार्च २०२४ पर्यंत तर ५ तालुक्यांना वर्षभर पाणीपुरवठा होईल, एवढा साठा प्रकल्पात आहे.
१ कोटी लोकांची तहान कशी भागणार?२०११च्या जनगणनेनुसार मराठवाड्याची लोकसंख्या १ कोटी ८७ लाख असून, यातील सुमारे ७६ लाख लोकसंख्या शहरी भागात २०११ नुसार आहे. जनगणना अजून झालेली नसून लोकसंख्या २ कोटींच्या पुढे गेल्याचा अंदाज असून, शहरी लोकसंख्येचा टक्का ५० टक्के असणे शक्य आहे. यानुसार पाऊस न पडल्यास सुमारे १ कोटींहून अधिक लोकसंख्येच्या पिण्याच्या प्रश्न गंभीर होऊ शकतो.
मराठवाड्यात किती पाऊस झाला?मराठवाड्यात ६८ दिवसांत केवळ ४९ टक्के पाऊस झाला. गतवर्षी ८० टक्के पाऊस झाला होता. नांदेडमधील काही तालुके वगळता समाधानकारक पाऊस नाही. मोठ्या ११ जलप्रकल्पांसह मध्यम व लघु ८६६ प्रकल्प, बंधाऱ्यांवर अवलंबून शहर, गावांना पाणीटंचाईची भीती आहे.
मराठवाड्यातील जिल्हानिहाय शहरे.......किती दिवस पाणी पुरणार?औरंगाबाद जिल्हाऔरंगाबाद शहर.........वर्षभर पुरेलवैजापूर..........सप्टेंबर २०२३सिल्लोड------ऑगस्ट २०२३पैठण---------नोव्हेंबर २०२३कन्नड--------३१ ऑगस्ट २०२३गंगापूर..............३१ ऑगस्ट २०२३खुलताबाद..........नोव्हेंबर २०२३फुलंब्री..............सप्टेंबर २०२३सोयगाव..............३१ ऑगस्ट २०२३
जालना जिल्हाजालना शहर..........वर्षभर पुरेलअंबड.................वर्षभर पुरेलपरतूर................डिसेंबर २०२३भोकरदन...........१५ दिवस पुरेलबदनापूर.............ऑगस्ट २०२३घनसावंगी..........ऑक्टो.२०२३जाफ्राबाद............ऑक्टो.२०२३मंठा.................डिसेंबर २०२३तीर्थपुरी............डिसेंबर २०२३
परभणी जिल्हा...................मानवत..........डिसेंबर २०२३पाथरी.............डिसेंबर २०२३सेलू..............डिसेंबर २०२३पालम............डिसेंबर २०२३पूर्णा..................सप्टेंबर २०२३सोनपेठ.............डिसेंबर २०२३
जिंतूर..................डिसेंबर २०२३गंगाखेड..............डिसेंबर २०२३
हिंगोली जिल्हा...............हिंगोली...............डिसेंबर २०२३वसमत.............डिसेंबर २०२३कळमनुरी.............डिसेंबर २०२३औंढा नागनाथ...........डिसेंबर २०२३सेनगाव................डिसेंबर २०२३
नांदेड जिल्हा..................कंधार....................३१ मार्च २०२४कुंडलवाडी............नोव्हेंबर २०२३किनवट.............जून २०२४देगलूर...............मार्च २०२४धर्माबाद..............सप्टेंबर २०२३बिलोली..................जून २०२४लोहा...............डिसेंबर २०२३उमरी................मार्च २०२४हदगाव.............ऑक्टोबर २०२३भोकर............ऑक्टोबर २०२३मुखेड................डिसेंबर २०२३मुदखेड............सप्टेंबर २०२३अर्धापूर............जून २०२४माहूर..................जून २०२४हिमायतबाग..........डिसेंबर २०२३नायगाव...............डिसेंबर २०२३
बीड जिल्हा............................बीड....................डिसेंबर २०२३अंबाजोगाई...........ऑक्टोबर २०२३परळी.................. ऑक्टोबर २०२३गेवराई.................. ऑक्टोबर २०२३माजलगाव...............डिसेंबर २०२३धारूर..................डिसेंबर २०२३केज................जानेवारी २०२४आष्टी.............डिसेंबर २०२३पाटोदा...............ऑक्टोबर २०२३शिरूर कासार............ ऑक्टोबर २०२३वडवणी..............डिसेंबर २०२३
लातूर जिल्हा........................उदगीर.......................वर्षभर पुरेलअहमदपूर...................डिसेंबर २०२३निलंगा.......................वर्षभर पुरेलऔसा......................डिसेंबर २०२३चाकूर....................डिसेंबर २०२३शिरूर अनंतपाळ..........नोव्हेंबर २०२३देवणी.......................नोव्हेंबर २०२३जळकोट...............वर्षभर पुरेलरेणापूर.................नोव्हेंबर २०२३
धाराशिव जिल्हा.............धाराशिव..................डिसेंबर २०२३तुळजापूर.................डिसेंबर २०२४नळदुर्ग...................डिसेंबर २०२३उमरगा................डिसेंबर २०२३मुरुम...................डिसेंबर २०२३कळंब................डिसेंबर २०२३भूम...................डिसेंबर २०२३परंडा.................डिसेंबर २०२३वाशी....................डिसेंबर २०२३लोहारा...............सप्टेंबर २०२३