शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
4
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
5
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
6
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
7
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
8
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
9
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
10
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
11
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
12
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
13
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
14
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
15
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
16
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
17
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
18
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
19
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
20
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ

समांतरच्या बैठकीवर पाच मिनिटांत पाणी!

By admin | Published: August 24, 2016 12:26 AM

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचा ठेका रद्द करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. करार रद्द करण्यापूर्वी मनपा प्रशासनातर्फे आयोजित केलेल्या बैठकीस

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचा ठेका रद्द करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. करार रद्द करण्यापूर्वी मनपा प्रशासनातर्फे आयोजित केलेल्या बैठकीस ‘एसपीएमएल’या मुख्य कंपनीच्या प्रतिनिधींनीच दांडी मारली. त्यामुळे प्रकल्पातील इतर छोट्या भागीदार कंपन्यांशी चर्चा करण्यात अर्थच नाही, म्हणत मनपा आयुक्तांनी अवघ्या पाच मिनिटांमध्ये बैठक गुंडाळली.समांतर जलवाहिनी योजनेचे काम करणाऱ्या कंत्राटदाराची हकालपट्टी करण्याचा निर्णय ३० जून २०१६ रोजी मनपा सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. त्यानुसार प्रशासनाने सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला करार रद्द करण्यासंदर्भात नोटीस बजावली. कंपनीने नोटिसीला उत्तरही दिले. मात्र करारातील कलम ३४.१ (ब) नुसार नोटीस दिल्यानंतर कंपनीसोबत बैठक घेऊन चर्चा करणे बंधनकारक आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचे निमंत्रण मनपा पदाधिकाऱ्यांनाही देण्यात आले होते. राजशिष्टाचार बाजूला ठेवून एका कार्यकारी अभियंत्याने पदाधिकाऱ्यांना बैठकीस बोलावले होते. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी बैठकीवर बहिष्कार घातला. नाइलाजास्तव मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी ऐनवेळी महापौरांच्या दालनाऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात बैठक घेतली. बैठकीला सिटी वॉटर युटिलिटीसह इतर उपकंपन्यांचे अधिकारी हजर होते. मात्र ६० टक्के शेअर्स व मूळ कंत्राटदार कंपनी एसपीएमएलचे अधिकारी हजर झाले नाहीत. एसपीएमएल कंपनीच्या संचालकांची यादी, एसपीएमएल व इतर उपकंपन्यांमध्ये झालेल्या कराराची कागदपत्रे देण्याच्या सूचना केल्या. मात्र अधिकाऱ्यांना याबाबत काहीच माहीत नव्हते. आयुक्तांच्या इतर प्रश्नांना उपस्थित अधिकारी समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यामुळे अवघ्या पाच मिनिटात बैठक गुंडाळण्यात आली. एवढा मोठा प्रकल्प आहे, करार रद्द होण्याची वेळ आलेली असताना मूळ कंत्राटदार कंपनीला गांभीर्य नाही, असे म्हणत उपकंपन्यांच्या अधिकाऱ्यांना आयुक्तांनी धारेवर धरल्याची माहिती सूत्रांनी दिली.