सोमनाथ खताळ, बीडयावर्षी जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात पाण्याची भीषण टंचाई. एवढी गंभीर परिस्थिीती उद्भवलेली असतानाही आजही पालीच्या बिंदुसरा धरणातून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. विशेष म्हणजे या पाण्याचा सर्रास शेतीसाठी वापर केला जात आहे. याकडे मात्र संबंधित विभाग ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.बीड शहराला तालुक्यातील पाली येथील बिंदुसरा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र या धरणाची पाणीपातळीही सध्या जोत्याखाली आहे. त्यामुळे बीडकरांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेची पळापळ सुरू आहे. अशातच बिंदुसरा धरणातून राहिलेले पाणीही लवकरच संपण्याची भिती पालिकेने वर्तविली होती. मागील वर्षभरापासून धरणाच्या भिंतीला तीन भलेमोठे भगदाड पडले होते. यातून दररोज पंधरा लिटर पाणी वाया जात होते. याबाबत ‘लोकमत’मधून वृत्तही प्रकाशित करण्यात आले होते. याची दखल घेत काही वरीष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून पाणीगळती थांबविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सध्या पुन्हा या धरणातून पाणी गळती सुरू झाली आहे. त्यामुळे झालेले काम निकृष्ठ झाले की, भिंत धोक्यात आली आहे, याचे उत्तर मात्र संबंधितांना देता येत नाही. धरणाच्या भिंतीचे भगदाड हे मुद्दामहून बुजविले जात नाही, असा आरोप मनविसेचे जिल्हाध्यक्ष शैलश जाधव यांनी केला आहे.लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता डी.एम.कोकणे म्हणाले, आम्ही धरणाचे भगदाड सिमेंट काँक्रीट करून बुजविलेले आहेत. भिंतीतून वाया जात असलेल्या पाण्याचा फारसा फरक पडत नाही. ही तांत्रिक समस्या आहे.बिंदूसरा धरणाची पातळी जोत्याखाली गेल्यामुळे शहराला माजलगावच्या धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे.४माजलगाव धरणातूनही सध्या मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा होत असल्याने धरणातील पाणी लवकरच संपण्याची भीती व्यक्त केली जात आहे.४धरणातील पाणी आरक्षित करण्यात यावे, या संदर्भात मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही पाठविलेले आहे.४या संदर्भात अद्याप कुठलीही कार्यवाही झालेली नाही.
‘बिंदुसरा’तील पाणी गळती सुरूच
By admin | Published: November 24, 2014 12:10 AM