लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे नांदेडची तहान भागविणारे विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण प्रकल्प ९० टक्के भरला आहे़ त्यामुळे नांदेडकरांवरचे जलसंकट टळले आहे़रविवारी पहाटे नांदेड शहरासह जिल्हाभरात पावसाने जोरदार सुरुवात केली होती़ महापालिकेने नागरीकांसाठी तात्पुरत्या निवाºयाची व्यवस्थाही केली होती़ तर गुरुद्वारा लंगर साहिबच्या वतीने नागरीकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती़ दरम्यान, सोमवारी दिवसभर पावसाने उघडीप दिली असली तरी, प्रकल्पाच्या वरच्या बाजूस मात्र पाऊस सुरु होता़ त्यामुळे प्रकल्पात पाण्याचा येवा सुरुच होता़ दुपारी १ वाजेपर्यंत प्रकल्पात ९० टक्के पाणीसाठा झाला होता़ त्यामुळे एका दरवाजातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता़प्रकल्पातील अल्प पाणीसाठ्यामुळे नांदेडकरांना एक दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येत होता़ आता प्रकल्पात पुरेसे पाणी असल्यामुळे नांदेडकरांवरील जलसंकट टळले आहे़ आसना नदीतही आजघडीला चांगला पाणीसाठा झाला आहे़
नांदेड शहराचा पाणी प्रश्न मिटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:38 AM