लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील १५ लाखांहून अधिक नागरिकांना यंदा कडक उन्हाळ्यात पाण्यासाठी भयंकर त्रास सहन करावा लागला. उन्हाळा संपला तरी महापालिकेला पाणीपुरवठा पूर्ववत करता आला नाही. जून महिना सुरू झाला तरी पाणीटंचाई कायम आहे. मंगळवारी जायकवाडी आणि फारोळ्यात दोन तास वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरात पाण्यासाठी ठणठणाट सुरू झाला. ज्या वसाहतींना पाणीपुरवठा करायचा होता त्यांना पाणी देता आले नाही. उशिराने का होईना पिण्यापुरते पाणी देऊन महापालिकेने औदार्य दाखविले.उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन न केल्याने प्रभारी कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांची उचलबांगडी करून त्यांच्याजागी अनुभवी कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांची वर्णी लावण्यात आली. चहेल यांच्याकडे उपअभियंतापदाची जबाबदारी सोपविण्यात आली. या फेरबदलानंतरही पाणीपुरवठ्यात पाहिजे तशा सुधारणा झालेल्या नाहीत. पावसाळा सुरू झाला तरी शहरातील पाणीपुरवठा विस्कळीतच आहे. आजही अनेक वसाहतींना पाचव्या आणि सहाव्या दिवशीच पाणी देण्यात येत आहे. शहागंज जलकुंभावरील १८ वॉर्डांना याचा सर्वाधिक फटाका बसत आहे. या गंभीर प्रश्नात महापालिका प्रशासन मार्ग काढायला तयार नाही. मंगळवारी जायकवाडीहून पाण्याचा उपसा सुरू असताना सकाळी ८.४५ वाजता अचानक वीजपुरवठा खंडित झाला. १० वाजता वीजपुरवठा पूर्ववत झाला. त्यामुळे ७०० आणि १४०० मि.मी. व्यासाच्या लाईन बंद होत्या. शहरातील शहागंज, जिन्सी, दिल्लीगेट, विद्यापीठ, क्रांतीचौक, सिडको एन-७, एन-५ येथील पाण्याच्या टाक्यांवर अवलंबून असलेल्या वसाहतींना मंगळवारी पाणीपुरवठा करता आला नाही. दुपारी टाक्यांमध्ये थोडेफार पाणी आल्यावर नागरिकांना पिण्यापुरते का होईना म्हणून अर्धा तास पाणी देण्याचा प्रयत्न महापालिकेने केला.‘एमआयडीसी’चे पाणी ६, तर मनपाचे ११ रुपयांत १ हजार लिटरशहरातील प्रत्येक नळकनेक्शनधारकाकडून मनपा प्रशासन पाणीपट्टीपोटी ४०५० रुपये वसूल करते. जायकवाडीहून शहरात १० लिटर पाणी आणण्यासाठी मनपाला ११ पैसे खर्च येतो. आठ पैशांमध्ये १० लिटर पाणी महापालिका नागरिकांना पाणी देते. १ हजार लिटर पाणी मनपाने दिल्यास खर्च ११ रुपये पडतो.शहरात मनपा पाच दिवसांआड तर कधी चार दिवसांआड पाणी देते. महिन्यातून पाच किंवा सात वेळेस पाणी येते. कोणाला दहा मिनिटे तर कोणाला तीन तास पाणी देण्यात येते. सर्वात कमी ज्याला पाणी मिळते त्याला ४ हजार रुपये देऊनही बिसलरीच्या बाटलीपेक्षाही महाग पाणी घ्यावे लागते.दोन दिवसांआडपाणी करामहापालिकेतील स्थायी समितीचे नवनिर्वाचित सभापती राजू वैद्य यांची भेट मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी घेतली. यावेळी दोघांमध्ये बराच वेळ विविध विकास कामांबाबत चर्चा झाली. वैद्य यांनी शहरातील पाणीपुरवठा दोन दिवसाआड करावा, अशी सूचना आयुक्तांना केली. पाणीपुरवठ्याचे सध्या नियोजन करणे सुरू आहे. शक्य असल्यास दोन दिवसाआड पाणी देण्याची तयारीही आयुक्तांनी दर्शविली. जायकवाडीत २४ तास वीजपुरवठा राहावा यासाठी स्वतंत्र फिडरसाठी २० लाख रुपयांची गरज आहे. १० लाख रुपये महापालिकेने वीज कंपनीकडे जमा केले आहेत. उर्वरित दहा लाख रुपयेही त्वरित देण्याचे आदेश आयुक्तांनी लेखा विभागाला दिले.पुंडलिकनगरपाणीप्रश्नी बैठकपुंडलिकनगर जलकुंभाच्या पाणीपुरवठ्याबाबत मंगळवारी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना महापौरांनी नमूद केले की, या भागातील विविध वसाहतींना चार दिवसाआड, तर कधी पाच दिवसाआड पाणी येत आहे. अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करून किमान तीन दिवसाआड तरी पाणी द्यावे, अशी सूचना करण्यात आली. यावेळी सभागृहनेता विकास जैन, नगरसेविका मीना गायके, गजानन मनगटे, माधुरी अदवंत आदींची उपस्थिती होती.
औरंगाबादमध्ये पाण्याचा ठणठणाट...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 12:25 AM
शहरातील १५ लाखांहून अधिक नागरिकांना यंदा कडक उन्हाळ्यात पाण्यासाठी भयंकर त्रास सहन करावा लागला. उन्हाळा संपला तरी महापालिकेला पाणीपुरवठा पूर्ववत करता आला नाही. जून महिना सुरू झाला तरी पाणीटंचाई कायम आहे.
ठळक मुद्देनिव्वळ निमित्त हवे : अनेक वसाहतींमध्ये पाणीपुरवठा नाही