लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : जलसंपदा विभागाचे उपविभागीय कार्यालय वसमत येथे मंजूर झाले मात्र या कार्यालयाचे कुलूपच उघडत नाही. येथे नियुक्त अधिकारी, कर्मचारीही वसमतकडे फिरकत नसल्याने कार्यालय स्थापन करण्याच्या उद्देशालाच हरताळ फासल्या जात आहे.वसमतस तालुक्यात जलसंधारणाची कामे व्हावीत यासाठी उपविभगीय कार्यालय मंजूर झाले. कार्यालयासाठी अधिकारी, कर्मचारीही तैनात झाले. यात एक उपविभागीय अभियंता, दोन अभियंते, दोन लिपीक, दोन तंत्रज्ञ आदींचा समावेश आहे.पूर्णा नदीवर बंधारे बांधण्याचे काम या कार्यालयाच्या माध्यमातून करणे अशी योजना समोर ठेवून कार्यालय स्थापन झालेले आहे. मात्र कार्यालय उघडले, कर्मचारी तैनात झाले. मात्र कामच नाही. त्यामुळे कर्मचारी, अधिकारीही मोकळे आहेत. नव्याने सुरू झालेल्या कार्यालयासाठी नवे काम,निधी मंजूर होणे, तांत्रिक मान्यता मिळणे व प्रत्यक्ष काम सुरू होणे आदी कामे आहेत. मात्र नवीन कामे मंजुरीचे काम प्रशासकीय स्तरावर सुरू आहेत. त्यामुळे सध्या तरी कोणतेही काम सुरू नाही. काम नसल्याने कर्मचारी अधिकारीही आपापली कामे करण्यात मग्न झाल्याने वसमतकडे कोणी सहसा फिरकत नाहीत. सदर प्रतिनिधीने भेट दिली असता कार्यालय कुलूपबंदच होते. त्यामुळे कोण कुठे गेले, याची माहिती मिळू शकली नाही. काम सुरू होण्यापूर्वी कार्यालय स्थापन झाल्याने आता कामे सुरू होईपर्यंत तरी अशीच अवस्था राहील असेच दिसत आहे.
जलसंपदास वसमत येथेही वालीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 12:49 AM